Nashik Graduate Election News : नाशिकमध्ये सत्यजीत तांबेंचा दणदणीत विजय; तर शुभांगी पाटलांचा पराभव

Satyajit Tambe, Shubhangi Patil News : सत्यजीत तांबे यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला
Satyajit Tambe, Shubhangi Patil News
Satyajit Tambe, Shubhangi Patil News Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Nashik Graduate Election News : नाशिक पदवीधर निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. या नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांचा मोठ्या मताने दणदणीत विजय झाला आहे.

Satyajit Tambe, Shubhangi Patil News
Nagpur News : काँग्रेसने पुन्हा करुन दाखवले; भाजपचा नागपुरात करेक्ट कार्यक्रम : अडबालेंच्या विजयाची पाच कारणे

मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच सत्यजीत तांबे यांची आघाडी कायम होती. तर पहिल्या फेरीतच महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या शुभांगी पाटील या पिछाडीवर होत्या. अखेर शुभांगी पाटील यांचा मोठ्या मताने पराभव झाला आहे. तर सत्यजीत तांबे यांचा मोठ्या मताने दणदणीत विजय झाला आहे.

Satyajit Tambe, Shubhangi Patil News
Amravati Graduate Election Result : अमरावतीत मताचा कोटा ठरला, लिंगाडे विजयाच्या उंबरठ्यावर!

सत्यजीत तांबे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव केला आहे. सत्यजीत तांबे यांनी पाचव्या फेरीअखेर एकूण ६८ हजार ९९९ मतं मिळवली. तर शुभांगी पाटील यांना फक्त ३९ हजार ५३४ मतांवर समाधान मानावं लागलं.

शुभांगी पाटील यांचा तब्बल २९ हजार ४६५ मतांनी पराभव झाला आहे. तर ठरलेल्या कोट्यापेक्षा १० हजार जास्त मते सत्यजीत तांबे यांना मिळाली आहेत.

दरम्यान, सत्यजीत तांबे यांचा विजय झाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला आहे. मात्र, शुभांगी पाटील यांचा पराभव झाल्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

Satyajit Tambe, Shubhangi Patil News
Nagpur News : काँग्रेसने पुन्हा करुन दाखवले; भाजपचा नागपुरात करेक्ट कार्यक्रम : अडबालेंच्या विजयाची पाच कारणे

गेल्या काही दिवसांपासून शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडी घडल्या. त्यामुळे राज्यात शिक्षक आणि पदवीधरची निवडणूक चर्चेत राहीली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com