Pune Congress News : ...म्हणून कसब्यातील १६ इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या; थोपटेंनी सांगितलं कारण

Kasaba By-Election : उद्या उशिरापर्यंत उमेदवाराचे नाव घोषित होईल
Sangram Thopate
Sangram ThopateSarkarnama
Published on
Updated on

Pune Congress News : पुण्यातील कसबा पेठ विधानसभेच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या पोटनिवडणुकीसाठी महाआघाडीतील काँग्रेस पक्षातून इच्छुकांची यादी मोठी आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे निरीक्षक संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांनी ऑनलाईन १६ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षांची मुंबई येथे बैठक झाली. त्यानंतर थोपटे यांनी आज १६ जणांच्या मुलाखतीबाबत कारण सांगितलं.

पुण्यातील काँग्रेसभवन (Pune Congress) येथे आमदार संग्राम थोपटे शनिवारी बोलत होत. यावेळी ते म्हणाले, या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा निरीक्षक म्हणून माझी जबाबदारी आहे. त्यानुसार मी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वारंवार बैठका घेत आहे. कार्यकर्त्यांची कसबा विधानसभा निवडणूक काँग्रेसनेच लढवावी, अशी तीव्र इच्छा आहे. येथून लढण्यासाठी पक्षातून इच्छुकांची संख्याही मोठी आहे. त्यामुळं निरीक्षक म्हणून मतं जाणून घेण्यासाठी सर्व इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती घेतल्या असल्याचे थोपटे यांनी सांगितलं.

Sangram Thopate
Congress News : तांबेंच्या आरोपानंतर काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू : वडेट्टीवार म्हणाले, 'प्रदेश कार्यकारणीने उत्तर द्यावे..'

या मुलाखतीनंतर काँग्रेसकडून कसबा पोटनिवडणुकीसाठी १६ जणांची नावे प्रदेश कार्यालयाकडे पाठवण्यात आली. त्यानंतर या नावाची छाननी केल्यानंतर दिल्लीतून काँग्रेसचा उमेदवार घोषित होणार असल्यांचं सांगण्यात आलं होतं.

यावेळी थोपटे यांनी उद्या (रविवारी) उशिरापर्यंत महाविकास आघाडीचा निर्णय होण्याची शक्यता वर्तविली. थोपटे म्हणाले, या क्षणापर्यंत कुणाच्याही नावाची घोषणा झाली नाही. महाविकास आघाडीतर्फे उद्या उशिरापर्यंत त्याबाबतची घोषणा होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि महाविकास आघाडीचे अन्य नेते अंतिम निर्णय घेतील.

Sangram Thopate
Kasba byelection : ब्राम्हण समाजाच्या नाराजीला मिळणार वाट; काँग्रेसकडून रोहित टिळकांच्या नावाचा विचार सुरु...

दरम्यान भाजपने चिंचवडसह कसबा येथील उमेदवार ठरविला आहे. महाविकास आघाडीचा निर्णय अद्याप घोषित करणे बाकी आहे. या दोन्ही ठिकाणांहून महाविकास आघाडी कुणाला उमेदवारी देणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com