Nashik Politics: आमदार सीमा हिरे यांनी प्रतिष्ठेचा विषय केला; CM फडणवीसांनी बडगुजर यांचा प्रवेश लांबणीवर टाकला!

Seema Hiray; Former BJP corporator, office bearer and MLA Seema Hiray's message to the Chief Minister Devendra fadnavis-आमदार सीमा हिरे आणि भाजप पदाधिकाऱ्यांची शिवसेनेचे बडतर्फे उपनेते सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात मोर्चेबांधणी
Sudhakar Badgujar & seema Hiray
Sudhakar Badgujar & seema HiraySarkarnama
Published on
Updated on

Seema Hiray News: शिवसेनेचे बडतर्फ उपनेते सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला विरोध हा आमदार सीमा हिरे यांनी प्रतिष्ठेचा विषय केला आहे. यासंदर्भात विविध पदाधिकाऱ्यांसह आज मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात आली. पदाधिकाऱ्यांनी भावनीक विषय केल्याने तूर्त हा प्रवेश लांबणीवर पडला आहे.

शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश नियोजित होता. मात्र तत्पूर्वी आमदार सीमा हिरे यांनी १४ माजी नगरसेवक आणि विविध पदाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी आमदार हिरे यांनी सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात दाखल गुन्हे आणि त्यांनी भाजप विरोधात केलेल्या कारवाया यांचे लिखित निवेदन दिले.

भाजपच्या प्रदेश कार्यालयात मोठ्या संख्येने भाजप पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना हा प्रवेश रोखावा अशी विनंती केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित होते. पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आज वटपौर्णिमा आहे. यानिमित्त आम्ही भाजपचे आणि शहरातील पदाधिकाऱ्यांच्या हितासाठी हे साकडे घालत आहोत, त्याचा गांभीर्याने विचार करावा, अशी विनंती केली.

Sudhakar Badgujar & seema Hiray
Sanjay Raut Politics: महानगर प्रमुख विलास शिंदे यांनी सस्पेन्स वाढवला, संजय राऊत यांना केले अप्रत्यक्ष टार्गेट!

यावेळी प्रशांत जाधव या कार्यकर्त्याने निवडणूक प्रचार आपल्यावर झालेल्या सशस्त्र हल्ल्याच्या जखमा दाखवल्या. भाजपच्या कार्यालयावर बडगुजर यांच्या निकटवर्तीयांनी दगडफेक केली होती. श्री. बडगुजर हे आपल्यावरील कायदेशीर प्रक्रियेपासून संरक्षण मिळावे म्हणून सत्ताधारी भाजप पक्षात प्रवेश करीत असल्याचा दावा या पदाधिकाऱ्यांनी केला.

Sudhakar Badgujar & seema Hiray
Nashik BJP News : बडगुजर तर सीमा हिरेंचे विरोधक, मग ढिकले आणि फरांदे का उभे राहिले हिरेंच्या पाठीशी?

यावेळी आमदार हिरे यांसह प्रदीप पेशकार, रामहरी संभेराव हे प्रदेश पदाधिकारी, सागर शेलार आणि सोनाली ठाकरे हे युवा आणि महिला आघाडीचे अध्यक्ष उपस्थित होत्या. ॲड श्याम बडोदे, माधुरी बोरकर, भगवान दोंदे, सतीश सोनवणे, कावेरी घुगे, प्रतिभा पवार, भाग्यश्री ढोमसे, छाया देवांग यांचं १४ माजी नगरसेवक आणि मोठ्या संख्येने पदाधिकारी होते.

विधानसभा निवडणुकीत भाजपच्या आमदार हिरे यांनी बडगुजर यांचा पराभव केला होता. अन्य निवडणुकांमध्ये देखील बडगुजर यांना मतदारांनी प्रतिसाद दिलेला नाही. आम्ही महापालिका निवडणुकीत भाजप अतिशय ताकदीने उतरणार आहे. त्यामुळे पक्षाला शंभर टक्के यश मिळवून देण्यासाठी भाजप पदाधिकारी सक्षम आहेत.

वादग्रस्त आणि अन्य पक्षांनी कारवाई केलेल्या लोकांना पक्षात प्रवेश देऊ नये. विशेषतः बडगुजर यांना कोणत्याही स्थितीत पक्षात घेऊ नये अशी विनंती यावेळी करण्यात आली. त्याला मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांची चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com