Sanjay Raut Politics: महानगर प्रमुख विलास शिंदे यांनी सस्पेन्स वाढवला, संजय राऊत यांना केले अप्रत्यक्ष टार्गेट!

Vilas Shinde; Suspense increased with the statement of Shiv Sena Thackeray party's metropolitan chief Vilas Shinde -महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात जाणार का यावर स्पष्ट वक्तव्य टाळले.
Sudhakar-Badgujar-Uddhav-Thackrey-Vilas-Shinde
Sudhakar-Badgujar-Uddhav-Thackrey-Vilas-ShindeSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News: शिवसेना उपनेते सुधाकर बडगुजर यांना उद्धव ठाकरे यांनी पक्षातून बडतर्फ केले. त्यानंतर सुरू झालेल्या नाराजी नाट्यात महानगर प्रमुख विलास शिंदे यांचा वारंवार उल्लेख होत आहे. यावर स्वतः शिंदे यांनी मात्र हा सस्पेन्स कायम ठेवण्याचाच प्रयत्न केल्याचे चित्र आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे महानगप्रमुख विलास शिंदे यांच्या कन्येच्या विवाहला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवर्जून हजेरी लावली होती. त्यांची ही हजेरी आणि संवाद बोलका होता. त्यानंतर दोनच दिवसांनी एकनाथ शिंदे यांनी पुन्हा शिंदे यांना भेटले.

त्याआधी शिवसेना शिंदे पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी विलास शिंदे यांच्याशी चर्चा केल्याचे बोलले जाते. महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष एक एक गडी जोडण्यासाठी आतुर आणि कोणत्याही थराला जाण्यासाठी तयार असल्याचा संदेश वारंवार देण्याचा प्रयत्न होतो.

Sudhakar-Badgujar-Uddhav-Thackrey-Vilas-Shinde
Dr. Vijaykumar Gavit Politics: नंदुरबार जिल्ह्यात निवडणुकीआधीच महायुतीत विसंवादाचे वारे... संघर्ष अटळ?

यासंदर्भात शिवसेना ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांनी मात्र एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जाणार की नाही?. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात नाराज आहात की नाही? पक्ष सोडणार की राहणार? यावर नरोबा कुंजरोबा अशी भूमिका घेत गोंधळ वाढवला आहे.

Sudhakar-Badgujar-Uddhav-Thackrey-Vilas-Shinde
Shivsena UBT Politics: उद्धव ठाकरेंच्या आजी-माजी जिल्हाप्रमुखांना अटक, स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्याला फटकावले!

विलास शिंदे यांनी आपण गेली ३० वर्ष शिवसेनेत काम करीत आहोत. शिवसेनेत कोणत्या नेत्याला कोणते पद आणि कायद्याचे हा अधिकार वरिष्ठांचा असतो. त्याबाबत नियुक्ती झाल्यावर नेहमीच नाराजी असते. मात्र नियुक्ती झाल्यावर ही नाराजी विसरून आम्ही कामाला लागलो. त्यामुळे नाराजीचा प्रश्न येत नाही, असे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे खासदार संजय राऊत आणि बडतर्फ नेते सुधाकर बडगुजर यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे. खासदार राऊत यांनी सुधाकर बडगुजर यांच्यावर खूप प्रेम केले. राऊत यांनी नेहमीच बडगुजर यांना सगळ्यांपेक्षा अधिक जवळ केले होते. राजकीय संधी म्हणून विविध पदे भरभरून दिली. दोनदा विधानसभेची उमेदवारी दिली. ज्यांना पक्ष भरपूर काही देतो तेच पक्ष सोडून जातात, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्यासारख्या लहान कार्यकर्त्यांची आठवण ठेवली. माझ्या कन्येच्या विवाहाला त्यांनी आवर्जून हजेरी लावली. हा एक कौटुंबिक सोहळा होता. त्यात आनंद आणि आभाराची जाणीव ठेवणे क्रमप्राप्त आहे. याबाबत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आमच्या सोहळ्याला हजेरी लावली, काहींनी त्यावरून राजकीय वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, अशी खंत विलास शिंदे यांनी व्यक्त केली.

गेले काही दिवस शिवसेनेचे महानगर प्रमुख शिंदे हे सूचक वक्तव्य आणि वर्तन करताना दिसले. ते काही दिवस पक्षापासून लांब होते. त्यासाठी कौटुंबिक विवाह सोहळा असे कारण त्यांनी दिले होते. पक्षप्रमुख ठाकरे यांनी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना मुंबईत निमंत्रित केले होते. त्यावेळी देखील शिंदे अनुपस्थित राहिले. आता त्यांनी शिवसेना नेते खासदार राऊत यांची भेट घेणार असल्याचे म्हटले आहे. आपण पक्ष सोडणार की शिवसेना शिंदे पक्षात जाणार यावर मात्र ते मौन बाळगतात. विलास शिंदे यांनी राजकीय सस्पेन्स वाढविण्याचे काम सुरू ठेवले आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com