Seema Hire Politics: पाणी सोडण्यावरून आमदार हिरे आणि ठाकरे गटाच्या गामणे यांच्यात पहाटेच जुंपली!

Seema Hire Politics; Municipal Corporation met the MLA and the corporator of the Thackeray group at water Tank-आमदार सीमा हिरे यांनी जल कुंभाचा वॉल बंद केल्याने सिडकोचे नागरिक पाण्यापासून वंचित झाल्याचा विरोधकांचा आरोप
Kiran Gamne & MLA Seema Hire
Kiran Gamne & MLA Seema HireSarkarnama
Published on
Updated on

BJP Vs Shivsena UBT: पाण्यासाठी नळावर भांडणे नेहमीचीच असतात. त्याची चर्चाही खूप होते. मात्र आज नाशिक शहरात चक्क भाजपच्या आमदार आणि माजी नगरसेविका यांच्यातच जलकुंभाच्या आवारातच व्हॉल्व बंद आंदोलनावरून जुंपली.

शहरातील पाथर्डी आणि परिसरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अनियमित होत असतो. पुरेशा दाबाने पाणी नसल्याने नागरिक त्रस्त असतात. त्यांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत. महापालिका प्रशासनाकडून त्यावर ठोस मार्ग निघाला नव्हता.

आज या प्रश्नावर भारतीय जनता पक्षाच्या आमदार सीमा हिरे यांनी पहाटे पाच लाच सिडकोतील जल कुंभाकडे धाव घेतली. पाथर्डी आणि परिसरात पाणीपुरवठा सुरळीत नाही. या प्रश्नावर त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर घेतले.

संतप्त आमदार हिरे यांनी याबाबत काय उपाययोजना करणार? असा प्रश्न केला. पार्थडी भागाला पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत जलकुंभाचे व्हॉल्व सुरू करू नये असा पवित्र घेतला. त्या स्वतःच जल कुंभाच्या व्हॉल्व बंद करून तिथेच थांबल्या. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे काही पदाधिकारी देखील होते.

Kiran Gamne & MLA Seema Hire
Dr Amol Kolhe : अजितदादांनी चॅलेंज दिलेले डॉक्टर, अभिनेते ते यशस्वी खासदार डॉ अमोल कोल्हे

भाजपच्या आमदार हिरे यांनी व्हॉल्व बंद केल्यामुळे सिडकोच्या अन्य भागालाही पाणी पोहोचले नाही. तेथील पाणीपुरवठा देखील विस्कळीत झाला. हे कळल्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेविका किरण गामणे यादेखील कार्यकर्त्यांसह तिथं पोहोचल्या.

यावेळी आमदार आणि माजी नगरसेविका कांगणे यांच्या चांगलीच जुंपली. एखाद्या भागाचा पाणीपुरवठा सुरळीत होत नसेल तर, सिडकोचा पाणीपुरवठा बंद करणे हा कुठल्या न्याय आहे, असा प्रश्न त्यांनी केला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांनाही त्यांनी चांगलेच सुनावले.

भारतीय जनता पक्ष तसेच शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते देखील यावेळी तेथे पोहोचले. त्यातून चांगलाच राजकीय वाद सुरू झाला. एरव्ही पाण्यासाठी नळावरची भांडणे चर्चेत असतात. आज मात्र सिडको परिसरात पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभाच्या आवारात आमदार हिरे आणि माजी नगरसेविका या दोन महिलांमध्ये चांगलीच जुंपलेली दिसली.

Kiran Gamne & MLA Seema Hire
Sanjay Raut Politics: 'काहीही केले तरी महाराष्ट्राची निवडणूक भाजपच्या हातून गेली आहे'

जवळपास तीन तास हा गोंधळ सुरू होता. यादरम्यान महापालिका अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून यावर मार्ग काढण्याचे वारंवार आश्वासने दिली. मात्र आमदार आणि त्यांच्या समर्थकांचे समाधान झाले नाही. अन्य नागरिकांनीही त्यात हस्तक्षेप केला.

त्यानंतर क्रमाक्रमाने पाणीपुरवठ्याचे व्हॉल्व सुरू करण्यात आले. जवळपास तीन तासांनी सिडको परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत झाला. आमदार हिरे आणि माजी नगरसेविका किरण गामने यांसह माजी नगरसेवक अमोल जाधव, पुष्पा आव्हाड, साहेबराव आव्हाड, बाळा दराडे, गोकुळ पगारे आदी विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी येथे गर्दी केली होती.

पाथर्डी फाटा परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. लोकप्रतिनिधी म्हणून याबाबत महापालिका प्रशासनाला वारंवार कळविले आहे. मात्र अधिकारी फोन देखील उचलत नाही. त्यामुळे प्रशासनाला जागे करण्यासाठी आज ही भूमिका घ्यावी लागली, असे आमदार हिरे यांनी यावेळी सांगितले.

नगरसेविका गामणे यांनी मात्र आमदार हिरे यांच्यावर गंभीर आक्षेप घेतला. आज पहाटे आमदार जलकुंभाच्या आवारात आल्या होत्या. मात्र सिडको, इंदिरानगर, पाथर्डी फाटा पाणीपुरवठा सुरळीत नव्हता. शहराला ५० एमएलडी पाणी दिले जाते. त्यामुळे सिडकोचा प्रश्न गंभीर झाला आहे. यावर सत्ताधाऱ्यांनी कधीही आवाज उठवलेला नाही. याचे वाईट वाटते असे त्या म्हणाल्या.

एकंदरच सिडको आणि परिसरात दाट लोकवस्ती आहे. या भागात प्रामुख्याने कामगार आणि औद्योगिक क्षेत्रातील कर्मचारी वास्तव्यास आहेत. त्यांची आज सकाळी जल कुंभावरील राजकीय वादविवादामुळे चांगलीच गैरसोय झाली. नळावरचे भांडण यापूर्वी ऐकले होते. आज मात्र चक्क आमदार आणि माजी नगरसेविकेतच जल कुंभाच्या आवारातच तासभर जुंपली. त्यामुळे तो शहरभर चर्चेचा विषय ठरला.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com