मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूकीत वेगवेगळ्या घडामोडी घडून येत आहेत. राज्यात सत्तापालट झाल्यानंतरची ही निवडणूक सर्वांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. भाजपकडून मुरजी पटेल (Murji Patel) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, तर ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शिवसेनेला पुन्हा लक्ष्य केले आहे.
नितेश राणे म्हणाले की, "लोकांमध्ये मिसळून सतत काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला भाजपाने उमेदवारी जाहीर केली. जमलेली गर्दी सांगते की, आमच्या मुरजी भाईंच्या कामाची ही पावती आहे. मला विश्वास आहे की, आता जसं वातावरण आहे, त्याप्रमाणे निवडणूक झाल्यावरही दिसेल, असंही यावेळी नितेश राणे यांनी म्हंटले आहे.
यावेळी राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नेते आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "स्वत:चा पक्ष वाचवता यांना आले नाही, चिन्ह वाचवले नाही. वडिल आजारी असताना आदित्य ठाकरे बाहेर पार्ट्या करत फिरत होते. प्रवासादरम्यान एकदा स्वत: रमेश लटके यांनी मला काही गोष्टी सांगितल्या. लटकेंनी सांगितले की, त्यांना मानसिक त्रास देण्यात येत होता. त्यांचे फोन मातोश्रीवर उचलत नव्हते, असा खळबळजनक आरोप राणे यांनी केला आहे.
दरम्यान आदित्य ठाकरे यांनी देखील शिंदे गटावर टीका केली होती. कालपर्यंत यांच्याकडून एका स्त्रीला त्रास देण्यात येत होता. या निवडणुकीत, आमची ही लढाई गद्दार वृत्तीच्या विरोधातली असणार आहे. त्यामुळे आमचा विजय हा निश्चित आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.