Ajit Pawar : नाशिकमध्ये अजित पवार गटाच्या सात नेत्यांना नियोजन समितीची लॉटरी

NCP News : जिल्हा नियोजन समितीने 20 नावे राज्य सरकारकडे पाठवली आहेत.
Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

NCP Nashik Politics : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सत्तेत सहभागी झाल्याने जिल्हा नियोजन समितीची पुर्नरचना करण्यातआली आहे. यामध्ये अजित पवार(Ajit Pawar) गटाच्या सात सदस्यांना नियोजन मंडळावर नियुक्तीची लॉटरी लागली आहे. विशेष म्हणजे या सदस्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) महिला आघाडीतून बडतर्फ करण्यात आलेल्या प्रेरणा बलकवडे यांचाही समावेश आहे.

नाशिक जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) रवींद्र पगार, रंजन ठाकरे, प्रेरणा बलकवडे, राजेंद्र भामरे, बाळासाहेब म्हस्के, केरू दादा खतेले, सुरेश अंबादास खोडे या सदस्यांच्या नियुक्तींचा आदेश उपसचिव नितीन खेडकर यांनी काढला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ajit Pawar
NCP Politics: अजित पवारांनी दिला भुजबळांच्या भात्यात आणखी एक बाण !

जिल्ह्यात नियोजन समितीवर नियुक्त करायच्या 20 राजकीय पदाधिकाऱ्यांची नियुक्ती रखडली आहे. जिल्हा नियोजन समितीने 20 नावे राज्य सरकारकडे पाठवली आहेत. पण त्याला अद्यापही मुहूर्त लागला नव्हता. त्यामुळे लोकप्रतिनिधींमध्ये नाराजी होती.

जिल्ह्यात शिवसेनेचे दोन आमदार असताना पालकमंत्रिपद दादा भुसे(Dada Bhuse) यांच्याकडे असल्यामुळे त्यांच्या मर्जीतील सदस्य नियुक्त करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठवला होता. आमदारांच्या संख्येनुसार भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रत्येकी पाच आमदार आहे. त्यामुळे त्यांना अधिक सदस्य मिळणं हे निश्चित होते. अध्यक्षपद पालकमंत्र्यांकडे तर सचिवपद जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे.

Ajit Pawar
Mushrif On Amol Kolhe: अजितदादांनंतर आता मुश्रीफांचा कोल्हेंबाबत मोठा खुलासा; म्हणाले, 'खासदारकीचा...'

राज्य सरकारकडून मिळणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचे वितरण या समितीच्या माध्यमातून केले जाते. समितीवर जिल्हा नियोजनाबद्दल ज्ञान असलेले सहा व विशेष निमंत्रित म्हणून 14 अशा एकूण 20 जणांची नियुक्ती करायची आहे. विशेष निमंत्रितामध्ये राजकीय नेत्यांच्या मर्जीतील पुढाऱ्यांची नावे असतात. पण प्रदीर्घ काळापासून या नियुक्त्या रखडल्या होत्या.

राज्यातील काही जिल्ह्यांत नियुक्या जाहीर झालेल्या असताना नाशिकमधील नियुक्त्या केव्हा जाहीर होणार, याकडे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीच्या काळातील सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. आता राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप(bjp) या तीन पक्षांच्या जिल्ह्यातील संख्याबळानुसार पालकमंत्र्यांच्या शिफारशीनुसार नियुक्त्या केल्या जातात. आता या रखडलेल्या नियुक्त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com