Shalarth ID Scam : १६० कोटींच्या घोटाळ्यातील फरार शिपाई अखेर पोलिसांच्या जाळ्यात, तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यालाही अटक

Amol Kulkarni Arrested in Shalarth ID Scam : राज्यातील बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्याला महत्वाचे वळण मिळाले आहे. पोलिसांनी फरार संशयित शिपाई अमोल कुलकर्णी याला अखेर अटक केली आहे.
Shalarth ID Scam | Bhausaheb Chavan
Shalarth ID Scam | Bhausaheb ChavanSarkarnama
Published on: 
Updated on: 

Amol Kulkarni and former education officer Shashikant Hingonekar arrested : राज्यातील बहुचर्चित १६० कोटींच्या शालार्थ आयडी घोटाळ्याला महत्वाचे वळण मिळाले आहे. या प्रकरणात नाशिक रोड पोलिसांनी फरार संशयित शिपाई अमोल कुलकर्णी याच्यासह तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांना शुक्रवारी (दि. २३) अटक केली. नाशिकरोड येथील गुन्ह्यात दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता सोमवार (दि. २६) पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

अमोल कुलकर्णी हा जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील एम. एफ. तराळ विद्यालयात शिपाई म्हणून कार्यरत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिस त्याच्या शोधात होते. अखेर शुक्रवारी त्याला या प्रकरणात अटक करण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार त्याला इंदूर येथून ताब्यात घेण्यात आले.

तर दुसरीकडे तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांना यापूर्वीच अन्य प्रकरणात अटक झाली होती. आता नाशिक रोड पोलिस ठाण्यातील गुन्ह्याच्या तपासासाठी ट्रान्सफर वॉरंटच्या आधारे ताब्यात घेऊन पुन्हा अटक दाखवण्यात आली आहे. याप्रकरणातील त्यांच्या कथित भूमिकेचा तपास नव्याने केला जाणार आहे.

Shalarth ID Scam | Bhausaheb Chavan
Jalgaon DCC Bank Election : जळगाव जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले ; तारखा जाहीर, 'हे' दहा मातब्बर रिंगणाबाहेर, वारसदारांची एण्ट्री

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या मागील तारखांपासून झाल्याचे दाखवून मान्यता मिळविणे, बनावट कागदपत्रांचा वापर करणे आणि त्याआधारे शासनाकडून वेतन उचलणे, असे गंभीर आरोप या घोटाळ्यात आहेत. नियुक्त्यांना मान्यता देताना वापरण्यात आलेली कागदपत्रे, त्यांची पडताळणी आणि या प्रकरणातील अन्य सहभागींचा शोध घेण्यासाठी एसआयटीकडून तपास सुरू आहे.

बनावट कागदपत्रे, कथित आर्थिक व्यवहार आणि अन्य संशयित आरोपींबाबत माहिती मिळविण्यासाठी दोघांची कोठडी आवश्यक असल्याचे तपासी अधिकारी आणि सरकारी अभियोक्त्यांनी न्यायालयात सांगितले. त्यानुसार न्यायालयाने दोघांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या चौकशीत घोटाळ्यातील कथित आर्थिक व्यवहार आणि मान्यता प्रक्रियेतील अनियमिततांबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Shalarth ID Scam | Bhausaheb Chavan
Nashik ZP News : तीन ग्रामपंचायत अधिकारी एकाचवेळी निलंबित, सीईओ ओमकार पवारांचा त्र्यंबकेश्वर दौऱ्यात दणका

कुलकर्णी साधा शिपाई ते एजंट

अमोल कुलकर्णी हा एम.एफ.तराळ विद्यालयात शिपाई म्हणून कार्यरत होता. परंतु शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्त्या आणि मान्यतांशी संबंधित कथित व्यवहारांमध्ये त्याची भूमिका एक एजंट म्हणून राहिली असल्याचा संशय आहे. मात्र, त्याच्या या कथित भूमिकेचे स्वरूप आणि व्याप्ती तपासातूनच स्पष्ट होणार आहे. शिक्षक नियुक्त्त्यांसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे कुलकर्णीसोबत कोणी तयार केली, नियुक्त्या मागील तारखांपासून झाल्याचे दाखविण्याची प्रक्रिया कोणी राबविली आणि संबंधित प्रस्तावांना मान्यता मिळवून देण्यासाठी कोणत्या व्यक्तींनी मदत केली, या प्रश्नांची उत्तरे विशेष तपास पथकाकडून शोधली जात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com