Shalarth ID Scam : शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या घोटाळ्याच्या तपासासाठी आता दोन स्वतंत्र ACP ; 1200 संशयित रडारवर

Maharashtra Shalarth ID scam 1200 suspects investigation : शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती आता वाढत चालली आहे. आतापर्यंत 1200 संशयित निष्पन्न झाले आहेत. तपासाला गती देण्यासाठी नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे.
Nashik Police Commissioner Sandeep Karnik
Nashik Police Commissioner Sandeep KarnikSarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra Shalarth ID Scam Investigation : शिक्षण क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या तब्बल १६० कोटी रुपयांच्या शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासाबाबत नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात आतापर्यंत १२०० संशयित निष्पन्न झाल्याचे तपासातून समोर आले आहे.

या घोटाळ्याची वाढती व्याप्ती आणि तपासासाठी अपुरे पडणारे मनुष्यबळ लक्षात घेता तपासाला अधिक गती देण्यासाठी आता एसआयटीच्या दोन स्वतंत्र्य पथकांमार्फत समांतर चौकशी केली जाणार आहे. दोन स्वतंत्र सहायक पोलिस आयुक्तांची (एसीपी) तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, वाढीव मनुष्यबळासह जिल्हानिहाय स्वतंत्र पथकेही तैनात करण्यात आली आहेत.

बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत. सुरुवातीला या दोन्ही मोठ्या गुन्ह्यांचा तपास शहर गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्याकडे सोपविण्यात आला होता. मात्र, तपासादरम्यान प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत गेली. त्यातच मुंबई उच्च न्यायालयाने गुन्ह्याचा तपास जलदगतीने करण्याच्या सूचना देतानाच तपासासाठी मनुष्यबळ वाढविण्याबाबतही निर्देश दिले होते. त्यानुसार शालार्थ घोटाळ्याच्या तपासाचे आता विभाजन करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दोन्ही गुन्ह्यांसाठी दोन स्वतंत्र तपास अधिकारी नियुक्त केले आहेत. नाशिकरोड पोलिस ठाण्यात २०२५ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस आयुक्त मिटके यांच्याकडे, तर मार्च २०२६ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास अंबड विभागाचे सहायक पोलिस आयुक्त सचिन बारी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

Nashik Police Commissioner Sandeep Karnik
Shalarth ID Scam : 160 कोटींच्या घोटाळ्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या भाजप नेत्याला जामीन मिळणार का? 3 ऑक्टोबरला सुनावणी

विशेषत: नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावाने बनावट नियुक्ती आदेश आणि शालार्थ आयडी तयार करून शासनाची फसवणूक करण्यात आली आहे. त्यादृष्टीने तपास करणाऱ्यासाठी उत्तर महाराष्ट्रीतल या जिल्ह्यांमध्ये तपास करण्यासाठी जिल्हानिहाय तपास पथके देखील तैनात करण्यात आली आहेत.

Nashik Police Commissioner Sandeep Karnik
Shalarth ID Scam: हजारहून अधिक शिक्षकांची भरती, पण एकही मूळ फाइल नाही! हायकोर्टानं शिक्षण विभागाला झाप झाप झापलं

या प्रकरणात नितीन उपासनी, नितीन बच्छाव, भाऊसाहेब चव्हाण यांच्यासह शिक्षण विभागातील अनेक बड्या अधिकाऱ्यांचा सहभाग समोर आला आहे. दोन पथकांमुळे आता आरोपींची कसून आणि समोरासमोर बसवून उलटतपासणी घेतली जाणार आहे. दोन स्वतंत्र्य पथकांमुळे या प्रकरणाच्या तपासाला आता अधिक गती मिळणार असून संशयितांची कसून चौकशी केली जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com