शंकरराव कोल्हे यांनी मराठी मातीतील माणसाचे कल्याण केले

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून कोल्हे कुटुंबियांचे सांत्वन.
Chhagan Bhujbal with Nilimatai Pawar & Kolhe Family
Chhagan Bhujbal with Nilimatai Pawar & Kolhe FamilySarkarnama
Published on
Updated on

कोपरगाव : राज्याचे माजी मंत्री शंकरराव कोल्हे (Shankarrao Kolhe) यांच्या निधनामुळे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज कोल्हे यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी स्व. कोल्हे यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Chhagan Bhujbal with Nilimatai Pawar & Kolhe Family
खळबळजनक : राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत यांच्या मुलाविरुद्ध नाशिकमध्ये फसवणुकीचा गुन्हा

यावेळी त्यांनी कोल्हे कुटुंबातील स्व. शंकरराव कोल्हे यांच्या पत्नी सिंधुताई कोल्हे, मुलगा नितीन कोल्हे, बिपीन कोल्हे, डॉ. मिलिंद कोल्हे, मराठा विद्या प्रसारक समाजाच्या सरचिटणीस निलिमाताई पवार, स्नुषा माजी आमदार स्नेहलता कोल्हे, नातू अमित कोल्हे, विवेक कोल्हे, अमृता पवार यांची भेट घेतली.

Chhagan Bhujbal with Nilimatai Pawar & Kolhe Family
भाजपच्या नगरसेवकांनी नागरिकांना वाऱ्यावर सोडले!

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, स्व. शंकरराव कोल्हे यांनी परदेशात उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी देशात परत आल्यानंतर आयुष्यभर शेतकऱ्यांची वेशभूषा परिधान केली.त्यांनी मराठी मातीतील माणसासाठी लोककल्याणाची कामे केली. शेती क्षेत्रात त्यांनी संशोधनाला प्राधान्य दिले.

ते म्हणाले, शेतकऱ्यांना शेतीला दुधासोबत इतर पूरक व्यवसायाची जोड मिळवून दिली. राज्यातील राजकारणात त्यांना विशेष स्थान होत. पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्यांच्यासोबत काम केलं. त्यांनी सहकार व शेती क्षेत्राविषयी सतत मार्गदर्शन केले. पवार साहेबांचे ते अतिशय विश्वासू सहकारी होते. त्यांच्या निधनाने सहकार महर्षी आणि सहकारातील संजीवनी हरपली असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असे त्यांनी सांगितले.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com