
Maharashtra Politics : मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दख्खनचा उठाव आणि सहकाराची मुहूर्तमेढ घटनेच्या 150 वर्षपुर्तीनिमित्त 'सहकाराचे सक्षमीकरण आणि राज्य शासनाचे धोरण' विषयावरील परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात आपल्या भाषणात बोलताना शरद पवार यांनी सहकारी संस्थांसाठी देवेंद्र फडणवीस यांना एक विनंती केली. शरद पवारांची विनंती तत्काळ देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली.
शरद पवार म्हणाले, गेल्या काही वर्षांमध्ये राज्यातील सहकारी साखर कारखान्यांची संख्या कमी झाली आहे. आधी 80 टक्के सहकारी कारखाने होते आणि 20 टक्के खासगी कारखाने होते. आता 50 टक्के खासगी कारखाने झाले आहेत. त्यामुळे या सर्वांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यासाठी एक कमिशन अपॉइंट करा आणि या सहकारी संस्थाचा अभ्यास करा, नेमक्या काय अडचणी आहेत हे समजून घ्या अशी विनंती पवारांनी फडणवीसांना केली.
फडणवीस यांनी तत्काळ शरद पवार यांनी केलेली ही मागणी मान्य केली. सहकारी संस्थांच्या बळकटीकरणासाठी आम्ही एक समीती स्थापन करु आणि त्याचा अभ्यास करु असे फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले.
तसेच, सहकारी उद्योगात हे केवळ साखर कारखाना चालू शकत नाही. आता त्याच्याशी संबंधित आणि इतर व्यवसाय करावे लागणार आहेत. सहकारी कारखान्यात प्रोफेशनल काम पाहायला मिळत नाही. मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी खोगीर भरती पाहायला मिळत असल्याचे ते म्हणाले.
देशात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर पहिल्यांदा सहकार विभागच वेगळं मंत्रालय करण्यात आले. अमित शाह यांच्या हातात याची जबाबदारी दिली. मोठ्या प्रमाणात त्यामुळे सहकार क्षेत्रात आपण पुढे गेलो आहोत असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार व अजित पवार दोघेही एकाच व्यासपीठावर आले होते. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघांच्या मध्ये शरद पवार यांची खूर्ची होती. त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही पवार एकत्र येण्याच्या चर्चेला उधाण आले. याशिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेही यावेळी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.