Sharad Pawar Nashik Morcha : रोहित पवारांचं जबरदस्त नियोजन, शरद पवारांच्या नेतृत्वाखाली 50 हजार शेतकरी उतरणार रस्त्यावर!

Sharad Pawar Farmers Protest : शरद पवार हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग नाशिकमधून फुंकणार आहेत. त्यासाठी पक्षाचे शिबिर व मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे.
Sharad Pawar, Rohit Pawar
Sharad Pawar, Rohit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली नाशिक येथे १५ सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांचे विविध प्रश्न व मागण्यांसाठी शेतकरी मोर्चा काढला जाणार आहे. तसेच त्याआधी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता १४ सप्टेंबरला राज्यस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजनही केले आहे. शेतकरी मोर्चासाठी किमान ५० हजारांहुन अधिक शेतकऱ्यांची उपस्थिती राहण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना आमदार रोहित पवार यांनी केल्या आहेत.

सुरुवातीला या शिबिराची केवळ तारीख ठरली होती, ठिकाणी ठरलेले नव्हते. आता ठिकाण ठरले असून नाशिक शहरातील स्वामिनारायण मंदिर येथे हे शिबीर होणार आहे. आमदार रोहित पवारांनी रविवारी (ता. ७) येथील हॉलची पाहणी केली. त्यानंतर पवार यांच्या उपस्थित पक्ष कार्यालयात नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी रोहित पवारांनी पदाधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या निश्चित केल्या व तयारीसंदर्भात सूचना केल्या.

लोकसभा निवडणुकीत नाशिकने महाविकास आघाडीला साथ दिली होती. दिंडोरीतून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे भास्कर भगरे हे खासदारकीला निवडून आले. मात्र त्यानंतर विधानसभेत समीकरणे बदलली होती. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकण्यासाठी शरद पवार यांनी त्याच नाशिक जिल्ह्याची निवड केली आहे.

Sharad Pawar, Rohit Pawar
Jalgaon News : पोलिसांनी टाळाटाळ केली, प्रांताधिकाऱ्यांनी दाखवली ताकद ; एका आदेशाने अपहृत मुलाची सुटका

पक्षाच्या प्रशिक्षण शिबिरात मोजक्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रवेश असणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची दिशा यावेळी निश्चित केली जाणार आहे. तसेच राज्यासह देशातील विविध विषयांवर चर्चा यावेळी चर्चा होणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतकरी कर्जमाफी, अतिवृष्टी मदत, दुधाला भाव यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला जाणार आहे.

Sharad Pawar, Rohit Pawar
Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणविरोधात अखेर छगन भुजबळ अॅक्शन मोडवर, घेतला मोठा निर्णय

शेतकऱ्यांच्या प्रश्नी काढलेल्या मोर्चाचे नेतृत्व स्वत: शरद पवार करणार आहेत. राज्यातील पक्षाचा हा पहिला मोर्चा आहे. या मोर्चासाठी पन्नास हजारांहून अधिक शेतकऱ्यांची उपस्थिती राहण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना आमदार रोहित पवार यांनी केल्या आहे. यावेळी बैठकीस प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे, कोंडाजी आव्हाड, जिल्हा प्रभारी सुनील भुसारा, खासदार भास्कर भगरे, माजी आमदार दीपिका चव्हाण, जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय पाटील, शहराध्यक्ष शेलार, महिला अध्यक्षा पाटील, उदय सांगळे, अॅड. माणिकराव शिंदे, छबू नागरे, राजाभाऊ ढगे, प्रवीण नागरे आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com