Abhishek Kalamkar: राजकारणात खळबळ! अभिषेक कळमकरांवर आणखी एक गंभीर आरोप; पोलिसांची मोठी कारवाई

Abhishek Kalamkar Faces Fresh Allegations: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर माजी महापौर अभिषेक कळमकर याच्याविरोधात आणखी एका युवतीने तक्रार केली.
Abhishek Kalamkar serious allegations
Abhishek Kalamkar serious allegationsSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar Political controversy: अहिल्यानगरमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर माजी महापौर अभिषेक कळमकर याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

नोकरीचे आमिष दाखवून अभिषेक कळमकर याने बलात्कार केल्याचा गुन्हा एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल असतानाच आणखी एका युवतीने तोफखाना पोलिसांकडे कळमकर विरोधात तक्रार केली आहे.

अभिषेक कळमकर (Abhishek Kalamkar) याच्या विरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात पुन्हा आणखी एक तक्रार दाखल झाली आहे. हे तक्रार एका युवतीचीच आहे. नोकरी देण्याच्या आमिषाने कळमकर याने आपल्याशी गैरवर्तन केले असल्याचे तिने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

महापालिका निवडणुकीच्या (Municipal Election) वेळी कळमकर याच्याशी ओळख झाली. मागच्या महिन्यात बालिकाश्रम रोडवरील महालक्ष्मी उद्यानाजवळ भेटला. त्याने कॉफी पिण्याच्या बहाण्याने एका पाढंऱ्या रंगाच्या गाडीत बसवून नेले. त्यानंतर नको  तिथे हात लावून त्याने गैरवर्तन केले, असे  युवतीने पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे.

Abhishek Kalamkar serious allegations
Maharashtra drug crackdown : ‘पोलिसच ड्रग्स विकतोय?’ काँग्रेस आमदाराचा थेट सवाल अन् विधानसभेत खळबळ; फडणवीसांच्या यंत्रणेनं सोशल प्लॅटफॉर्म्ससह कुठं-कुठं लावलंय जाळं!

अभिषेक कळमकर याच्याविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, हा गुन्हा तोफखाना पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. आता तोफखाना पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Abhishek Kalamkar serious allegations
Leopard attack Maharashtra : बिबट्यांचा हैदोस अन् सरकार गाढ झोपेत? माजी मंत्र्यांनं गावात बैलगाडीभर पत्रांची मिरवणूक काढून पंतप्रधानांना धाडली

पोलिसांनी कळमकर याच्या घराची काल झडती घेतली. यावेळी पोलिसांनी काही कागदपत्रे आणि इलेक्ट्राॅनिक वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यापासून कळमकर पसार आहे. पोलिसांची दोन पथके त्याच्या मागावर आहेत.

पीडित युवतीला नगर शहरातील विविध ठिकाणी, तसेच पुणे जिल्ह्यातील शिरूर इथल्या एका लॉजवर नेऊन अत्याचार केला. मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून वेळोवेळी कपडे काढण्यास भाग पाडून तासनतास त्रास दिल्याचा आरोप पीडित युवतीने  केला आहे.

दरम्यान, आज आणखी एका युवतीने कळमकर याच्याविरुद्ध तक्रार अर्ज दिला आहे. कळमकर याने नोकरी देण्याचे आमिष दाखवून आपल्याशी गैरवर्तन केले. नको तिथे हात लावला. त्याला तातडीने अटक करावी, अशी मागणी संबंधित युवतीने पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जात केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com