Eknath Khadse bungalow theft : खडसेंच्या बंगल्यातील चोरी प्रकरणात मोठी अपडेट; उल्हासनगर कनेक्शन अन् दोन सख्खे बंधू...

Eknath Khadse Bungalow Theft Case Ulhasnagar Connection Revealed in Police Investigation : आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगावातील बंगल्यात झालेल्या चोरीप्रकरणी जळगाव पोलिस चोरांच्या शोधात उल्हासनगरात तळ ठोकून आहेत.
Eknath Khadse bungalow theft
Eknath Khadse bungalow theftSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon NCP leader theft case : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगावातील बंगल्यात झालेल्या चोरीप्रकरणी एक महत्त्वाचे कनेक्शन उघड झाले आहे. या चोरीच्या घटनेत उल्हासनगरातील दोन सख्ख्या सराईत गुन्हेगार भावांचा समावेश असून त्यांच्या शोधासाठी जळगाव पोलिस उल्हासनगरात तळ ठोकून आहेत.

तीन दिवसांपूर्वी मध्यरात्री खडसे यांच्या शिवरामनगर इथल्या बंगल्यातून सात ते आठ तोळे सोने आणि सुमारे 35 हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेली होती. चोरांनी घरातील विशिष्ट कपाटे उघडून महत्त्वाच्या फाइल्स, सीडीज आणि पेन ड्राइव्ह लंपास केल्याचा दावा एकनाथ खडसेंनी केल्यानंतर खळबळ उडाली.

एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी ही चोरी सामान्य नसून चोरांचा नेमके काय घ्यायचे आहे हे माहीत होते, असा खळबळजनक दावा पत्रकार परिषदेत केला होता. त्यांनी भ्रष्टाचाराशी संबंधित कागदपत्रे, 10 सीडीज आणि 25 ते 30 पेन ड्राइव्ह चोरीला गेल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करताना जळगाव (Jalgaon) पोलिसांना या चोरीत उल्हासनगर इथल्या दोन सराईत गुन्हेगार सख्ख्या भावांचा सहभाग असल्याचे आढळून आले. संशयितांच्या शोधासाठी जळगाव पोलिस उल्हासनगरमध्ये दाखल झाले असून, त्यांनी विठ्ठलवाडी पोलिसांसोबत संयुक्त मोहीम हाती घेतली आहे. उल्हासनगरमध्ये काही ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवण्यात आले.

Eknath Khadse bungalow theft
MNS exposes voter fraud : मतदार यादीत घोळावर-घोळ; आयुक्तांच्या निवासापाठोपाठ तलाठी मोबाईलवर 288 मतदार नोंदणी

तपास निर्णायक टप्प्यात

जळगाव आणि विठ्ठलवाडी पोलिसांच्या संयुक्त तपासामुळे प्रकरण वेगाने पुढे जात असून, काही संशयितांची चौकशी सुरू आहे. पोलिस सर्व शक्यता तपासात घेत आहेत, आरोपींचा लवकरच पर्दाफाश होईल, असा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात आरोपींचा हेतू राजकीय होता की केवळ चोरीचा, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल; परंतु उल्हासनगरच्या कनेक्शनमुळे हे प्रकरण राज्यात चर्चेचा विषय ठरले आहे.

Eknath Khadse bungalow theft
Eknath Shinde Shiv Sena : भाजपमधून शिवसेनेत दाखल झाले; दिलीप भोईर यांच्यासह 21 जणांना सक्तमजुरी, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला धक्का

चोरटे कार्यक्रमासाठी जळगावात

आमदार खडसे यांच्या मुक्ताई बंगल्याच्या परिसरातील सर्व सीसीटीव्हींचे चित्रीकरण बारकाईने तपासले आहे. तेव्हा जळगाव शहरातील नातेवाईकांकडे आलेल्या उल्हासनगरातील तिघांनी खडसे यांच्या बंगल्यात धाडसी चोरी केल्याचे आढळले. सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे माग काढला असता, तिघे मास्टर कॉलनीतील त्यांच्या एका नातेवाईकांकडे कार्यक्रमानिमित्त आले होते.

चोरीत वापरेलेले वाहन जप्त

चोरी केलेल्या संशयित तिघांच्या विरोधात इतर ठिकाणी यापूर्वी बरेच गुन्हे दाखल आहेत. जळगावमधील नातेवाईकाकडे त्यांच्या बॅग आणि चोरीच्या गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आढळून आली. पोलिसांकडून दुचाकी जप्त करण्यात आली आहे. मात्र, बॅगांमध्ये फक्त कपडेच सापडले. तिन्ही चोरट्यांपैकी दोघे सख्खे भाऊ आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com