Nilesh Ghaywal News: कुख्यात गुंड निलेश घायवळला सर्वात मोठा दणका; पासपोर्ट रद्द; पोलिसांना कारवाईसाठी 'फ्री हँड'

Nilesh Ghaywal Crime News: कुख्यात गुंड निलेश घायवळ पोलिसांना चकवा देत परदेशात पळून गेला आहे. विशेष म्हणजे त्याच्यावर मोक्का (MCOCA) अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल असताना त्याला पासपोर्ट कसा मिळाला याविषयी अनेक शंका उपस्थित केल्या जात आहे.
Nilesh Ghaywal passport case
Nilesh Ghaywal passport caseSarkarnama
Published on
Updated on

Pune News: पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ पोसपोर्टप्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे. पासपोर्ट प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने गुंड घायवळला मोठा दणका दिला आहे.प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने रद्द घायवळचा पासपोर्ट प्रादेशिक कार्यालयाकडून रद्द करण्यात आला आहे. आता प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाच्या मोठ्या दणक्यानंतर परदेशात पळून गेलेल्या निलेश घायवळला (Nilesh Ghaywal) पुन्हा भारतात परत आणण्यासाठीच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कुख्यात गुंड निलेश घायवळ पोलिसांना चकवा देत परदेशात पळून गेला आहे. विशेष म्हणजे त्याच्यावर मोक्का (MCOCA) अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल असताना त्याला पासपोर्ट कसा मिळाला याविषयी अनेक शंका उपस्थित केल्या जात आहे. पोलिस प्रशासनावर आणिपासपोर्ट कार्यालयाच्या कार्यपध्दतीवरही ताशेरे ओढण्यात आले होते.पण आता पासपोर्ट कार्यालयानं घायवळचा पासपोर्ट रद्द करण्याचे आदेश गुरुवारी (ता.23)काढले आहेत.

पुणे आणि अहिल्यानगर पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये गुंड निलेश घायवळन अहिल्यानगरमधील आपल्या गावाच्या पत्तावर पासपोर्ट काढल्याचे समोर आले होते.तसेच धक्कादायक बाब म्हणजे पासपोर्टसाठी त्याने आपल्या आडनावात देखील बदल केला.'घायवळ' ऐवजी 'गायवळ' नावाची कागदपत्रे सादर केल्याचंही तपासात उघड झालं होतं.

पासपोर्ट(Passport) कार्यालयाच्या दणक्यानंतर आता पुणे पोलिसांकडून भारतात परत आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येत आहे. पोलिसांकडू घायवळ विरोधात लूकआऊट नोटीस आणि इंटरपोलची ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली आहे.

Nilesh Ghaywal passport case
NCP MLA's will Meets Ajit Pawar: राष्ट्रवादीचे आमदार अजित पवारांच्या भेटीला; प्रदेशाध्यक्ष पदाबाबत चर्चा होणार..?

पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनीपरदेशात पळून गेलेल्या घायवळचा पासपोर्ट रद्द करण्याचे आदेश दिले होते.गायवळ नावावर कोणतेही गुन्हेगारी कृत्य नोंद नसल्याने पोलिसांनी त्याला एनओसी दिली. तसेच पासपोर्ट ऑफिसला आपल्यावर गुन्हा दाखल नसल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र देखील त्याने दिले होते. यामुळे त्याला पासपोर्ट मिळाला होता.

निलेश घायवळ याने पासपोर्ट मिळवण्यासाठी पुण्याच्या घरचा पत्ता देण्याऐवजी अहिल्यानगर शहरातील पत्ता दिला. नुसता पत्ता बदलला नाही,तर त्यासाठी अडनावात देखील बदल केला.घायवळचे त्याने 'गायवळ' केले. निलेश बन्सीलाल गायवळ नाव देताना रहिवाशी पुरावा म्हणून आधार कार्ड जोडले. हे आधार कार्ड देखील बनावट असल्याचे पोलिस तपासात आता समोर आलं आहे.

Nilesh Ghaywal passport case
Prakash Abitkar : पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या होमपीचवर महायुतीचे आव्हान

पासपोर्टसाठी निलेश घायवळने अहिल्यानगरमधील गौरी घुमट, आनंदी बाजार, माळीवाडा मार्ग, असा पत्ता दिला होता. आता या पत्त्यावर पुणे पोलिसांनी तपास केला. यात पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी निलेश घायवळ याने जोडलेले कागदपत्रे, आधारकार्ड, पॅनकार्ड आणि भाडे करारपत्र हे बनावट असल्याची माहिती समोर आली आहे.

निलेश घायवळ याचे पासपोर्ट व्हेरिफेक्शनसाठी पासपोर्ट पुणे प्रादेशिक कार्यालयाकडून डिसेंबर 2019 मध्ये प्रकरण आले होते. यासाठी निलेश घायवळ याने अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पत्ता दिला. पोलिसांच्या तपासणीत ही व्यक्ती संबंधित पत्त्यावर आढळून आली नाही. त्यामुळे तत्कालीन पोलिस अधीक्षकांनी प्रतिकूल म्हणजे, ही व्यक्ती आढळून येत नसल्याचा शेरा मारून पासपोर्ट पुणे प्रादेशिक कार्यालयाकडे प्रकरण पाठवले होते,अशी माहिती अहिल्यानगरचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com