

Nashik News, 16 Jan : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील महापालिका निवडणुकीतील खदखद आता बाहेर आली आहे. निकालआधीच शहराध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे पक्षाला हा धक्का मानला जात आहे.
महापालिका निवडणुकीत जागावाटप आणि उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात वाद झाला होता. महायुतीच्या जागावाटपात गजानन शेलार यांच्या भूमिकेवरून प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. हा वाद आता आणखी टोकाला गेला आहे.
पक्षाचे शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी राजीनामा दिला आहे. पालिका निवडणुकीची आज मतमोजणी आहे. निकालाआधीच हा राजीनामा, वेगळेच संकेत देत आहे. पक्षाने महापालिका निवडणुकीत महायुतीत समझोता केला होता. मात्र जागा वाटपातच शहराध्यक्ष अडथळा आणत असल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे शहराध्यक्षांना चर्चेतून बाजूला केल्यावर तोडगा निघाला.
हा तोडगा निघाल्यानंतरही शहरात अनेक ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार उभे होते. प्रयत्न करूही या उमेदवारांनी माघार घेतली नाही. उमेदवारांना कोणाचा पाठिंबा आहे, याची जोरदार चर्चा होती. माजी नगरसेवक शेलार यांनी पक्षाच्या नेत्यांवर गंभीर आरोप केलेत. विशेषता निवडणूक प्रभारी आमदार सुनील भुसारा यांच्या कार्यशैलीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली.
एका निवडणुकीत उमेदवारांना कोणतीही मदत अथवा आर्थिक पाठबळ पक्षाकडून मिळाले नाही, असे त्यांनी सांगितले. महापालिका निवडणुकीच्या दरम्यानच आपण राजीनामा देणार होतो. मात्र त्याचा पक्षाच्या उमेदवारांवर प्रतिकूल परिणाम झाला असता. त्यामुळे राजीनामा देण्यासाठी वाट पाहिली, असे शेलार म्हणाले.
महापालिका निवडणुकीचे मतमोजणी आज होत आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने 29 उमेदवार दिले होते. यातील सर्वच उमेदवारांची कामगिरी सुमार झाल्याची राजकीय चर्चा आहे. त्यामुळे निकालात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय कामगिरी करणार? याची उत्सुकता आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर शेलार यांचा राजीनामा पक्षाला धक्का देणारा ठरला आहे. दरम्यान शेलार यांचा राजीनामा विविध कारणांनी चर्चेत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच त्यांचे पुतणे बबलू शेलार यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. भाजपने शेलार यांना उमेदवारी देखील दिली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.