Mumbai News, 16 Jan : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काल पार पडलेल्या मतदानानंतर समोर आलेल्या एक्झिट पोलनुसार मुंबईत ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसण्याचा आणि भाजप-शिंदंच्या शिवसेनेला एकहाती सत्ता मिळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
विविध एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला १०० हून अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. तर मराठी मुद्द्यावरून मुंबईत रान उठवणाऱ्या ठाकरे बंधुंना मुंबईत फारसं यश मिळणार नसल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
अशातच आता सर्व एक्झिट पोलचे अंदाज जाहीर होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंबाबत निवडणुकीपूर्वी केलेली भविष्यवाणी खरी ठरल्याची चर्चा सुरू झाली आहे. एक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार भाजप आणि शिंदेसेनेला १३८ जागा तर ठाकरे बंधूंना ५८ ते ६५ जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि वंचितला १२ ते १६ जागा मिळण्याचा अंदाज आहे.
तर जेडीएसच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला १२७ ते १५४ ठाकरे बंधूंच्या युतीला ४४ ते ६४ आणि काँग्रेस वंचित आघाडीला १६ ते २५ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, ही एक्झिट पोलची आकडेवारी समोर येताच निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरेंबाबत भविष्यवाणी केली होती की, 'उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीत राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव होईल.'
त्यामुळे आता फडणवीसांची भविष्यवाणी खरी ठरतेय अशीच चर्चा सुरू झाली आहे. कारण मनसेने याआधी सर्व निवडणुका स्वबळावर लढवल्या होत्या. त्यावेळी मुंबईत मनसेला २०१२ साली २८, २०१७ साली ७ जागा मिळाल्या होत्या. शिवाय पुण्यात २०१२ साली २९ आणि २०१७ साली अवघ्या २ जागा मिळाल्या होत्या. मात्र, आता उद्धव ठाकरेंसोबत युती केल्यानंतरही राज ठाकरेंना जास्त जागा मिळणार नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.