Sharad Pawar News : मोदींची हुकमशाही राजवट जनताच मोडून काढणार; पवारांनी व्यक्त केला विश्वास!

Lok Sabha Election 2024 : "उज्ज्वला गॅस बाबत महिलांची फसवणूक केली. आज गॅसचे दरही वाढले आहेत, पवारांची मोदींवर सडकून टीका..
Sharad Pawar News
Sharad Pawar NewsSarkarnama

Jalgaon News : ईडी, सीबीआय अशा तपास यंत्रणांचा विरोधकांना संपवण्यासाठी वापर करुन देशात हुकूमशाही राजवट चालवले जात आहे. मात्र देशातील जनताच ही हुकूमशाही मोडून काढेल असा आपल्याला विश्वास आहे, असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले. ते जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. (Latest Marathi News)

Sharad Pawar News
Dhairyasheel Mohite Patil join NCP : एका रात्रीत आमदार केलेलं पार्सल पुन्हा एका रात्रीत बीडला माघारी पाठवू’ ; मोहिते पाटलांचा सातपुतेंवर हल्लाबोल

रावेर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारासाठी त्यांनी जामनेर येथील मंगल कार्यालयात मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पक्षाचे माजी खासदार ईश्वर बाबूजी जैन, माजी आमदार संतोष चौधरी, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर आदी नेते उपस्थित होते.

यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर जाहीर टीका केली. देशात आज महागाई, बेरोजगारी वाढली आहे. उज्ज्वला गॅस बाबत महिलांची फसवणूक केली. आज गॅसचे दरही वाढले आहेत. मोदी राज्यकारभार करण्यात अपयशी ठरले आहेत. मात्र मोदी आणि शहा यांनी ईडीचा वापर करून विरोधी पक्षांवर कारवाई केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना कारागृहात टाकले. त्यांनी हुकूमशाही राजवट चालविली आहे. मात्र जनता ही राजवट मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Sharad Pawar News
BJP Candidate Sarvesh Singh Dies : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी दु:खद बातमी; लोकसभा उमेदवाराचं निधन...
Sharad Pawar News
NCP News: दक्षिण महाराष्ट्रातून ‘घड्याळ’ गायब ; पुणे जिल्ह्यात दोनच ठिकाणी उमेदवार रिंगणात

देशातील संविधान बदलविण्याची गर्जना भाजपचे खासदार करतात. मात्र संविधान बदलविण्याचा अधिकार कोणालाही नाही. राहुल गांधी यांनी काढलेल्या पदयात्रेला देशात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. देशातील युवक त्यांच्या पाठीशी उभे राहत आहेत, असेही शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com