Jalgaon NCP News : जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघ आहेत. एका पोटनिवडणुकीतील जळगाव लोकसभेतील ‘राष्ट्रवादी’चा विजय वगळता गेली पाच टर्म भारतीय जनता पक्षाकडेच आहे. या दोन्ही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा पर्यायाने महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व महाविकास आघाडीचे शिल्पकार वा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज कोणता मंत्र देणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे. (Curiosity about what Sharad Pawar will say for the Loksabha elections)
अमळनेर (Jalgaon) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) ग्रंथालय सेलच्या अधिवेशनासाठी शरद पवार, (Sharad Pawar) विरोधीपक्ष नते अजित पवार, (Ajit Pawar) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, (Jayant Patil) माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) येत आहेत. शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची टीम जळगाव जिल्ह्यात येण्याची ही पहिलीच वेळ आहे. शरद पवार गुरुवारी रात्री आठला राजधानी एक्सप्रेसने मुंबईहून जळगावला दाखल झाले आहेत. अजित पवार व जयंत पाटील दोंडाईचा (जि. धुळे) येथील कार्यक्रमानंतर अमळनेरला येणार आहेत.
दरम्यान, शरद पवार यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांची बैठक अमळनेरला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयात होणार आहे. श्री. पवार जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार असल्याचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील व आमदार अनिल पाटील यांनी सांगितले. दोन्ही लोकसभा निवडणुका पक्ष व महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढण्याबाबत चर्चा होईल. त्या दृष्टीने शरद पवार आढावा घेणार असून, ते मार्गदर्शनही करणार आहेत. त्यामुळे दोन्ही लोकसभेसाठी कोणता मंत्र देणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.
दरम्यान, जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघ सद्यस्थितीत भाजपच्या ताब्यात आहेत. गेली पाच टर्म दोन्ही मतदारसंघ भाजपच्याच ताब्यात आहेत. त्या अगोदर मतदारसंघ कॉंग्रेसकडे होते, तर एका पोटनिवडणुकीत जळगाव लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला यश मिळाले होते. वसंतराव मोरे निवडून आले होते. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत दोन्ही लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसने लढले होते. मात्र, त्यांना यश आले नाही.
जळगाव लोकसभेतून गुलाबराव देवकर यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र, मोदी लाटेत त्यांनाही अपयश आले. या वेळीही दोन्ही लोकसभा मतदारसंघ पक्षाने लढविण्याचे ठरविले आहे. भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना पक्षाने विधान परिषदेवर प्रतिनिधित्व दिले आहे. त्यांच्याकडे निवडणुकांची खानदेशची जबाबदारी दिली आहे. त्यांच्या पक्षप्रवेशानंतर या पहिल्यादांच निवडणूक होणार असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाचीही कसोटी लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.