Dhule News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधानसभेतील विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सज्जड दम भरला आहे. पक्षातील अतर्गत वाद पाडापाडी, जिरवाजिरवीमुळे पक्षाचं (NCP News) नुकसान होत आहे. यामुळे कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम करावं, अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली. ते काल (दि.१६ जून) धुळे येथे बोलत होते.
अजित पवार म्हणाले, "मागील काही वर्षांत आपल्यातीलच अंतर्गत वादामुळे, एकमेकांच्या जिरवा-जिरवीच्या खेळामुळे धुळ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नुकसान झालेलं आहे. यामुळे यापुढे एकमेकांची पाडापाडी अन् जिरवा-जिरवीचं राजकारण आता खपवून घेणार नाही, प्रत्येक कार्यकर्त्याने प्रामाणिकपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्य केलंच पाहिजे."
शिंदे-फडणवीस सरकर सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्याचं अजित पवार म्हणाले. पैसा जनतेचा अन् जाहीरातबाजी यांची केली जातेय. कुणाला पाहायचचं नसेल, तरी यांचे फोटो पाहा, असा चिमटाही अजित पवारांनी काढला आहे.
अजित पवार पुढे म्हणाले, "सरकारच्या या अशा जाहिरातबाजीने जनतेचे प्रश्न सुटतील का? मग हा इतक्या पैशांचा खर्च कशासाठी? करोडो रुपयांचा चुराडा कशासाठी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.