Sharad Pawar News : आजच्या आंदोलनाने दिल्लीची झोप उडाली असेल; कांदा निर्यातबंदीवरून पवार कडाडले

Sharad Pawar Slams Central Government Over Onion Export Ban : कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाला विरोध करत शरद पवारांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे...
PM Modi, Sharad Pawar
PM Modi, Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Nashik Farmers Protest : कांदा निर्यातबंदी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आक्रमक झाले आहेत. शरद पवार यांनी नाशिकमधील चांदवड येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होत आंदोलकांना पाठिंबा दिला. यावेळी शरद पवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी सध्या हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाला किंमत मिळत नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हाती कमी पैसे पडतात, असे म्हणत शरद पवार यांनी केंद्र सरकार हल्लाबोल केला.

शेतकऱ्याला दोन पैसे मिळायला लागले की केंद्र सरकार लगेच निर्णय घेते. आधी कांद्याच्या निर्यातीवरील शुल्क वाढवले. आता कांद्याच्या निर्यातीवर बंदीच घातली. कांदा निर्यात बंदीचा हा निर्णय शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त करणारा आहे. त्यामुळे कांद्यावरील निर्यातबंदी ही उठवलीच पाहिजे, अशी मागणी शरद पवार यांनी केली.

PM Modi, Sharad Pawar
Nashik Politics: नाशिक लोकसभा ठाकरे गटाला सोडण्यात येणार ? शिवसेना नेत्यांनी पवारांची भेट घेतल्याने चर्चा

रास्ता रोको करायाचा आणि लोकांना त्रास द्यायचा याची आम्हाला काही हौस नाही. पण आंदोलन केल्याशिवाय दिल्लीला कळत नाही. आजच्या आंदोलनाने दिल्लीची झोप उडाली असेल. आम्ही केंद्राशी चर्चा करणार, हा निर्णय बदलणार, असे आता राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे. मात्र, ज्यावेळी हे सगळे सुरू होते, त्यावेळी कुणाला आठवण का आली नाही? पण चांदवडला शेतकरी रस्त्यावर येऊन आपली शक्ती दाखवणार आहेत, हे जेव्हा त्यांना कळले त्यावेळी त्यांनी हालचाल सुरू केली, अशी टीका शरद पवारांनी केली. सध्याच्या राज्यकर्त्यांचे धोरण हे शेतकरी विरोधी आहे, असा आरोपही शरद पवारांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नाशिकच्या निफाडमध्ये 26 नोव्हेंबरला प्रचंड गारपीट झाली. या गारपिटीमुळे कांद्यासह द्राक्षाचे मोठे नुकसान झाले. गेल्या वर्षीही गारपिटीमुळे असेच नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकरी संकटात आला आहे. अशी परिस्थिती असताना सरकारने मदत करण्याची गरज आहे. पण केंद्र सरकारने द्राक्ष निर्यात बांगलादेशला करण्याबाबत मोठा निर्णय घेतला. तर दुसरीकडे बांगलादेशने द्राक्ष आयातीवर 160 रुपये एवढे शुल्क वाढवले. याकडे सरकार लक्ष देत नाही. कमी किमतीत माल पाठवता येत नसल्याने द्राक्ष उत्पादक उद्ध्वस्त होईल, असे शरद पवार म्हणाले.

PM Modi, Sharad Pawar
Sharad Pawar: कांदा उत्पादकांसाठी शरद पवार रस्त्यावर; चांदवडला आज राष्ट्रवादीचा रास्ता रोको

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com