Pune Congress : ...म्हणून पुणे काँग्रेस रस्त्यावरच भरवणार शाळा!

Sanjay Balgude : जाणून घ्या, नेमकं काय आहे कारण? काँग्रेस नेते संजय बालगुडे यांनी दिली आहे माहिती.
Sanjay Balgude
Sanjay BalgudeSarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : महानगरपालिकेने पुणे शहरातील मिळकतकर थकबाकी असलेल्या शाळांना जप्तीच्या नोटिसा पाठवल्या आहेत. या विरोधात पुणे काँग्रेस रस्त्यावर शाळा भरून आंदोलन करणार आहे.

कर आकरणी व कर वसुलीचे काम महानगरपालिकेने सुरू केले आहे. पुण्यातील अनेक शिक्षण संस्था तसेच शाळा व महाविद्यालयांनी कर भरणा केला नसल्याचे समोर आले आहे, त्यामुळे महापालिकेने जप्तीच्या नोटिसा दिल्या आहेत.

तर 'संस्थाकडे कर थकले असतील परंतु पालिका अधिकाऱ्यांनी अनेक शाळांना केवळ नोटिसा दिल्या नाहीत, तर त्यांची कार्यालय देखील सील केली आहेत.' अशी माहिती काँग्रेस(Congress ) नेते संजय बालगुडे यांनी सरकारनामाशी बोलताना दिली.

तसेच, ही कारवाई करताना पालिकेकडून सरळ सरळ भेदभाव केला जात आहे. अनेक मंगल कार्यालय आहेत ज्यांना जाणिवपूर्वक कमी कर आकारणी केली आहे. तर दुसरीकडे शाळांना सक्ती केली जात असल्याचा आरोपही बालगुडे यांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sanjay Balgude
AAP News: सरकारी तिजोरीवर दरोडा टाकणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; भ्रष्टाचाराविरोधात 'आप' मैदानात

याशिवाय 'पुण्यातील मोठ्या व्यावसायिक व उद्योजकांना सवलत दिली जाते. मात्र ज्या शहरात महात्मा फुले, चिपळूणकर, बाबूराव जगताप यांनी समाजासाठी विद्या दानाचे कामे केले, त्या विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात शाळा जप्तीच्या नोटिसा पाठवल्या जात आहेत आणि कार्यालयं सील केली जातात हे दुर्दैव आहे.'

'त्यामुळे याचा निषेध म्हणून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून महात्मा फुले गंज पेठ येथे 03 जानेवारी 2024 रोजी रस्त्यावर प्रतिकात्मक शाळा भरवून निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.' असे संजय बालगुडे(Sanjay Balgude) म्हणाले.

महापालिकेने त्वरीत आपल्या धोरणात बदल करावा, थकबाकीच्या शिक्षण संस्थांना बजावलेल्या नोटिसा मागे घ्याव्यात व त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांना थकीत रकमेचे हप्ते बांधून द्यावेत अशी मागणीही यावेळी बालगुडे यांनी केली आहे.

Sanjay Balgude
Mcoca Act : पुण्याच्या रितेश कुमारांचं `मोक्का`चं शतक तर पिंपरी-चिंचवडच्या विनयकुमार चौबेंचं अर्धशतक, तरीही...

मागील तीन-चार महिन्यांपासून पुणे महापालिकेने(Pune Municipal Corporation) कर वसुलीचा सपाटा सुरू केला आहे. यामध्ये त्यांनी थकबाकी असणाऱ्या शाळा, महाविद्यालय, शिक्षण संस्थांना जप्तीच्या नोटिसा पाठवल्या आहेत. माझ्या माहितीनुसार अनेक शाळांमध्ये जाऊन कार्यालयं सुद्धा सील केली आहेत. त्याचे पुरावे सुद्धा माझ्याकडे आहेत. या सगळ्या गोष्टींच्या निषेधार्थ आम्ही महापालिकेला अल्टिमेटम दिला आहे.

(Edited By - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com