Kolhapur Politics : कोल्हापुरात महाडिक-पाटील वाद पेटला; राजाराम कारखान्याच्या संचालकांना बेदम मारहाण

Chhatrapati Sugar Factory Issue : यावरून पुन्हा सतेज पाटील आणि अमल महाडिक यांच्यात राजाराम सहकारी साखर कारखान्यावरून पुन्हा जुंपण्याची शक्यता आहे.
Kolhapur Politics
Kolhapur PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापुरात माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील आणि माजी आमदार अमल महाडिक गटातील वाद चिघळला आहे. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शाहू मार्केट यार्डातील प्रादेशिक साखर सहसंचालकांच्या कार्यालयावर मंगळवारी (दि. २) धडक मोर्चा काढण्यात आला होता.यानंतर रात्री आठच्या सुमारास सतेज पाटील गटाच्या कार्यकर्त्यांकडून छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या संचालकांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. यामुळे वातावरण चिघळण्याची शक्यता आहे.

कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याकडून विरोधी गटाच्या सभासदांचा ऊसच तोडून नेला जात नसल्याचा जाब विचारण्यासाठी राजर्षी छत्रपती परिवर्तन आघाडीच्या वतीने आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शाहू मार्केट यार्डातील प्रादेशिक साखर सहसंचालकांच्या कार्यालयावर मंगळवारी (दि. २) धडक दिली.सतेज पाटील आणि अमल महाडिक यांच्यात राजाराम सहकारी साखर कारखान्यावरून पुन्हा जुंपण्याची शक्यता आहे.

Kolhapur Politics
Amravati : हिंमत असेल तर आमदार अपात्रतेचा निर्णय घ्या, सरकारला कुणाचे आव्हान..

छत्रपती राजाराम कारखान्याचे संचालक प्रकाश चिटणीस यांना मारहाण करण्यात आली आहे.घरी जात असताना कसबा बावडा येथे सतेज पाटील गटांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे.मारहाण करणाऱ्यांमध्ये माजी नगरसेवक आणि माजी स्थायी समिती सभापती संदीप नेजदार यांचा समावेश आहे.मारहाण केल्यानंतर सतेज पाटील गटाचे कार्यकर्ते यांनी एसपी ऑफिस गाठले आहे.(Chhatrapati Sugar Factory Issue)

दरम्यान, यावरून पुन्हा सतेज पाटील आणि अमल महाडिक (Amal Mahadik) यांच्यात राजाराम सहकारी साखर कारखान्यावरून पुन्हा जुंपण्याची शक्यता आहे. सभासदांचा ऊस नेत नसल्याच्या कारणावरून आमदार पाटील यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. निवडणूक झाल्यानंतर राजाराम कारखान्यात सभासदांच्या हिताच्या विरोधात कारभार सुरु आहे.

आजच्या घडीला जिल्ह्यात उसाची कमतरता आहे. रोज राजाराम कारखाना दोन तास बंद असतो. मात्र सभासदांचा ऊस कारखाना उचलत नाही. निवडणुकीत विरोधात प्रचार केलेल्या सभासदांना त्रास दिला जात आहे. बी आर माने यांच्या पावतीसमोर विरोधक लिहिल्याचा आरोप यावेळी आमदार सतेज पाटील यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जे विरोधक आहेत त्यांचा ऊस घेऊन जायचं नाही असले षडयंत्र सत्ताधाऱ्यांनी केले आहे.त्याचा निषेध करून साखर आयुक्तांनी यामध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली.तीन वर्ष उस नेला नसल्यास पोटनियमानुसार सभासद व रद्द होते. विरोधक सभासद संपवण्याचा डाव सत्ताधारी आखत असल्याचा आरोपी यावेळी करण्यात आला.

मंगळवारी सकाळी आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी राजाराम कारखाना संदर्भात काढला होता. साखर संचालक कार्यालयावर काढलेल्या मोर्चात सभासदांचा ऊस लवकर घेण्यात यावा असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला होता.यानंतर आता संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी कारखान्याच्या एमडींना चोप दिला आहे.या संपूर्ण प्रकरणानंतर कोल्हापुरात त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Kolhapur Politics
Karad News : कासारशिरंबेतील बहीण-भाऊ झाले अधिकारी; बोंद्रे कुटुंबीय आनंदले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com