Sharad Pawar politics: ठरले, सिन्नरमध्ये उदय सांगळे यांच्या हाती पवारांची तुतारी!

Sharad Pawar; Uday Sangli joints NCP Sharad Pawar may candidate from sinnar-तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर उदय सांगळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रवेश दिला, सांगळे हाती घेणार तुतारी!
Jayant Patil, Uday Sangle & Sharad Pawar
Jayant Patil, Uday Sangle & Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

NCP Sinner News: सिन्नर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आपल्या उमेदवार देण्यात आहे. नाशिक पूर्व मध्ये उमेदवार कोण याची घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुकांसाठी आजची रात्र झोप उडविणारे असणार आहे.

गेली अनेक दिवस सिन्नर मतदारसंघ महाविकास आघाडीच्या कोणत्या घटक पक्षाकडे असेल, यावर उत्सुकता होती. आज सायंकाळपर्यंत याबाबत अनिश्चितता कायम होती. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मतदारसंघ शिवसेनेकडे आहे.

कोरेगाव मतदारसंघाच्या बदल्यात सिन्नर मतदारसंघ शिवसेनेला देण्याचा प्रस्ताव खासदार संजय राऊत यांच्याकडे देण्यात आला होता. आज सकाळी देखील खासदार राऊत यांनी खासदार राजाभाऊ वाजे यांच्याशी या विषयावर चर्चा केली.

सिन्नर मतदारसंघातील राजकीय आढावा यावेळी घेण्यात आला. त्यामुळे सिन्नर मतदारसंघ आणि उमेदवार दोन्ही बाबत अनिश्चितता होती. ही अनिश्चितता आज सायंकाळी संपली. त्यामुळे सांगळे समर्थकांना दिलासा मिळाला आहे.

Jayant Patil, Uday Sangle & Sharad Pawar
Anil Gote Politics: शिवसेना ठाकरे गटाने माजी आमदार अनिल गोटे यांना पुरस्कृत केले!

गेले तीन दिवस पक्ष प्रवेशासाठी श्री सांगळे विविध स्तरावर प्रयत्न करीत होते. प्रवेशासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान कार्यालयात गेले तीन दिवस त्यांनी बस्तान मांडले होते. याबाबत काल रात्री झालेल्या चर्चेत नाशिक जिल्ह्यातील मतदार संघाचा निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार आज सायंकाळी चारला उदय सांगळे यांना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रवेश दिला. यावेळी पक्षचे जिल्हा अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, गोकुळ पिंगळे, शहराध्यक्ष गजानन शेलार यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

सिन्नर मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार कोकाटे यांना यापूर्वीच उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात उमेदवार कोण? याविषयी मोठ्या प्रमाणावर दावे आणि प्रति दावे करण्यात येत होते.

Jayant Patil, Uday Sangle & Sharad Pawar
Sharad Pawar Politics: `हरियाणा`ची पुनरावृत्ती नको, म्हणून महाविकास आघाडीची सावध पावले!

शिवसेना या जागेसाठी आग्रही होती. उदय सांगळे यांच्या प्रवेशाला शिवसेनेच्या नेत्यांनी विरोध दर्शविला होता. शिवसेनेचे प्रवक्ते खासदार राऊत यांनी याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली होती.

गेले दोन दिवस चर्चेचा हा घोळ सुरू असताना आज त्यावर तोडगा काढण्यात आला. सायंकाळी श्री सांगळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश देण्यात आला. त्यामुळे सिन्नर विधानसभा मतदारसंघातून सांगळे हे उमेदवार असतील यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

याबाबतचे अधिकृत घोषणा उद्या होईल. या प्रवेशानंतर सिन्नर येथे सांगळे यांच्या कार्यालयाबाहेर समर्थकांनी जल्लोष केला. सायंकाळी उशिरा श्री सांगळे यांचे जोरदार स्वागत केले जाणार आहे. श्री सांगळे सिन्नरमध्ये आल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेणार आहेत, असे सांगण्यात आले.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com