Sharad PawarNews; छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य रयतेचे राज्य!

कळवण येथे उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीच्या शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते झाले.
Sharad Pawar at Kalwan
Sharad Pawar at KalwanSarkarnama

कळवण : (Nashik) या देशात अनेक राजे होऊन गेली. या सगळ्या राजांनी त्यांच्या नावाने राज्ये केली होती. एकच राज्य होते जे कुटुंबाच्या नावाने नव्हते. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) राज्य स्थापन केले ते रयतेचे राज्य होते असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar)यांनी केले. (Chhatrapati Shivaji Maharaj is the only king who`s kingdom is of peoples)

Sharad Pawar at Kalwan
Sharad Pawar News; नागालँडमध्ये भाजपला पाठींबा दिलेला नाही!

कळवण येथे कळवण तालुका छत्रपती स्मारक समितीच्या वतीने उभारण्यात आलेल्या उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीच्या शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरण श्री. पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवराज छत्रपती संभाजीराजे होते. यावेळी शिल्पकार अनिल राम सुतार, केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, पालकमंत्री दादाजी भुसे, माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ, आमदार नितीन पवार आदी उपस्थित होते.

Sharad Pawar at Kalwan
Nashik News; पाकिस्तानमधील परिस्थितीमुळे कांदा दर कोसळले?

यावेळी श्री. पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण आपल्याला सदैव होते. त्याची विविध कारणे आहेत. सत्ता हाती आल्यानंतर ती सामान्यांसाठी वापरायची असते. याचा आदर्श त्यांनी निर्माण केला. या देशात राजे-रजवाडे अनेक होऊन गेले. आपण कधी मुघलांचे नाव ऐकले, कधी जयपूरचे नाव ऐकले तर कधी अन्य राज्यांचे नाव ऐकले. मात्र छत्रपती शिवाजी महाराज असे एकमेव राजे आहेत की, ज्यांचे राज्य कुटुंबाच्या नव्हे तर रयतेच्या नावाने स्थापन झाले होते.

कळवण तालुका छत्रपती स्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार यांचा कळवण तालुक्यातील शिवप्रेमीच्या वतीने खासदार शरद पवार व युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी सत्कार केला.

Sharad Pawar at Kalwan
Satyajeet Tambe News: खर्चाचा बाऊ न करता जुनी पेन्शन लागू करा!

कार्यक्रमास आमदार माणिकराव कोकाटे, आमदार दिलीप बनकर, नगराध्यक्ष कौतिक पगार, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार, कीर्तनकार संजय धोंडगे, प्रा. यशवंत गोसावी, हेमंत टकले, श्रीराम शेटे, रवींद्र पगार, रंजन ठाकरे, विशाल नरवाडे, बंडू कापसे, संजय चव्हाण, विजयराज वाघ, रामचंद्र पाटील, देविदास पवार, धनंजय पवार, अशोक पवार, रावसाहेब शिंदे, कारभारी पगार उपस्थित होते.

पालकमंत्री दादा भुसे यांनी यावेळी अर्थसंकल्पाची माहिती देऊन येणाऱ्या दहा दिवसांत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सभागृहात निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी शिवरायांच्या विचारांवर वाटचाल करण्यासाठी एकत्र राहू व देशाला महासत्ता बनविण्यासाठी प्रयत्न करण्याचे सांगितले. आमदार नितीन पवार यांनी छत्रपती पुतळ्यापासून प्रेरणा घेऊन दळवट येथे माजी मंत्री एटी पवार यांचे स्मारक उभारण्यात येईल असे सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com