Rahul Gandhi News : राहुल गांधींच्या समर्थनार्थ अमरावतीत लावलेले बॅनर भाजप कार्यकर्त्यांनी फाडले.. ; ...मोहब्बत की जीत

Maharashtra Politics : यह नफरत के खिलाफ मोहब्बत की जीत है.." असा आशय या बॅनरवर होता.
Rahul Gandhi News
Rahul Gandhi News Sarkarnama
Published on
Updated on

Amravati : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा खासदारकी बहाल करण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ अमरावती येथे काँग्रसकडून लावण्यात आलेले बॅनर भाजपच्या कार्यकर्त्यांनी फाडले. यामुळे वाद निर्माण झाला आहे. हा वाद चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. राहूल गांधी यांच्या समर्थनार्थ काँग्रेसच्या नेत्या, आमदार यशोमती ठाकुर यांनी लावलेले बॅनर भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस बादल कुलकर्णी यांनी फाडले.

Rahul Gandhi News
Pimpri Police News : राज्यपाल रमेश बैस यांच्या दौऱ्यानिमित्त सामाजिक कार्यकर्ते पुन्हा नजरकैदेत ; विरोध नसतानाही कारवाई...

केंद्र सरकार विरोधात बॅनर लावल्याचा आरोप भाजप युवा मोर्चाने केला आहे. "केंद्र सरकारच्या हुकूमशाहीच्या दबावाला बळी पडत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची रद्द केलेली खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली.. यह नफरत के खिलाफ मोहब्बत की जीत है.." असा आशय या बॅनरवर होता.

भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांची काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत हे बॅनर फाडले. यामुळे आता भाजप- काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने येण्याची शक्यता नाकारता येत नाही. "केंद्र सरकारवर काँग्रेस बिनबुडाचे आरोप करीत असल्याचे बादल कुलकर्णी यांनी सांगितले.

Rahul Gandhi News
Medha Kulkarni news : मेधा कुलकर्णींवर कारवाई करा ; आरोप-प्रत्यारोपाचे मोहोळ उठले..

‘मोदी’ आडनावावरून राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्याविरोधात मानहानीच्या खटल्यात सूरत कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती.चार ऑगस्ट रोजी ही शिक्षा सुप्रीम कोर्टानं स्थगित केली होती. 2019 मध्ये निवडणूक प्रचारादरम्यान कर्नाटकमधील कोलार येथील सभेत राहुल गांधी यांनी सर्व चोरांचे आडनाव मोदी कसं असंत? असा प्रश्न त्यांनी सभेत विचारला होता.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com