
नाशिक : भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी मोगलांच्या (Moughal) सैनिकांना सर्वत्र संताजी, (Santaji) धनाजी (Dhanaji) दिसायचे तसे उद्धव ठाकरे (Uddhav Thackray) यांना सर्वत्र शिंदे (Eknath Shinde) फडणवीस (Devendra Fadanvis) दिसतात, असे विधान केले आहे. हे विधान केवळ हास्यास्पद नव्हे तर मराठी इतिहासाचा अवमान आहे. अशी टिका शिवसेनेचे (Shivsena) संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी (Bhausaheb Choudhary) यांनी केली आहे. (Shivsena leader Bhausaheb Choudgary criticised BJP leader Chandrashekhar Bavankule)
श्री. चौधरी `सरकारनामा`शी बोलत होते. ते म्हणाले, संताजी घोरपडे, धनाजी जाधव (Maratha Fighters) हे निष्ठांवत (Faithful) मावळे होते. शिंदे हे फुटीर तर फडणवीस फुटीरांना पाठींबा देणार आहेत. फुटीरांचे समर्थन करता करता बावनकुळे यांचा वैचारीक स्तर घसरलेला दिसतो.
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकारण पेटले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी नागपूर येथे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली. यावेळी त्यांनी मोगलांच्या सैनिकांनी धसका घेतल्याने त्यांना जसे सर्वत्र संताजी धनाजी दिसायचे तसे उद्धव ठाकरे यांना सर्वत्र शिंदे - फडणवीस दिसतात असा टोला लगावला होता. त्याचा चौधरी यांनी चांगलाच समाचार घेतला.
यावेळी बावनकुळे यांनी सांगितले की, अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल विजयी होतील व आपला पराभव होईल, अशी भीती उद्धव सेनेला वाटते. त्यामुळे मुरजी पटेल यांच्या निवडणूक अर्जावर आक्षेप घेऊन अर्ज रद्द करण्याचे षडयंत्र चालू आहे. पण ते षडयंत्र यशस्वी होणार नाही.
याबाबत चौधरी म्हणाले, मराठी माणसांचा मतदारसंघ असलेल्या अंधेरीला भाजपला उमेदवारी देताना एकही मराठी कार्यकर्ता मिळाला नाही, यातच सर्व काही आले. भाजपला मराठी माणसाशी देणे घेणे नाही अन् त्यांना पाठींबा देणाऱ्या एकनाथ शिंदे गटाला भाजपपुढे मान तुकवायची आहे. महाराष्ट्राचे अत्यंत मोठे नुकसान करणारे हे राजकारणाचे षडयंत्र सध्या सुरु आहे. राज्यातील सुज्ञ जनता हे सर्व पहाते आहे.
ते पुढे म्हणाले, संताजी घोरपडे हे छत्रपती शिवरायांचे सेनापती होते. धनाजी जाधव हे अत्यंत कडवे व एकनीष्ठ मावळे होते. या दोन मावळ्यानी हिंदवी स्वराज्यावर मुघलांचे वादळ घोंघावत असताना अत्यंत पराक्रमाने व खबीर राहून मुघलांची दाणादाण केली. त्यांचा धसका दिल्लीतील मुघलांनाही घेतला होती. त्यांची तुलना पक्षविरोधी कारस्थान करून शिवसेनेशी दगाबाजी केलेल्या नेत्यांशी व त्या फुटीरांना पाठींबा व शक्ती देणाऱ्या नेत्यांशी करणे हा मराठी इतिहासाची गल्लत आहे. त्यामुळे श्री. बावनकुळे यांना छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची माहिती नसावी. त्यांनी छत्रपती व संताजी, धनाजी या त्यांच्या मावळ्यांचा जाज्ज्वल्य इतिहास पुन्हा एकदा अभ्यासावा असे मला वाटते.
राज ठाकरे यांचे तरी ऐका
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांचे पत्र ट्विटर व समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहे. त्यात त्यांनी शिवसेनेचे निष्ठावंत (कै) आमदार रमेश लटके यांच्या कार्याची माहिती भाजपला लिहिलेल्या पत्रात दिली आहे. एका प्रामाणिक व जनतेच्या मनात स्थान असलेल्या शिवसेना आमदाराच्या पत्नी श्रीमती ऋतुजा लटके यांना उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी देऊन परंपरा पाळली आहे. हीच आमदार लटके यांना श्रद्धांजली मानली जाते. ही मराठी संस्कृती आहे. तीचा आदर करीत भाजपने तीचा आदर करावा, असे आवाहन राज ठाकरे यांनी पत्रात केले आहे. आता भाजप तीचा स्विकार करील का?. हे लवकरच कळेल. अन्यथा भाजपचा मराठी माणसाकडून त्यांचा पराभव ठरलेलाच आहे.
...
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.