Nashik APMC Election : नाशिक बाजार समितीतील निवडणूक प्रचारातील वाद थांबण्यास तयार नाही. शिवसेनेचे वादग्रस्त नेते चुंभळे पिता-पुत्रांनी आमदार हिरामण खोसकर यांना फोनवरून प्रचारात भाग घेतल्यास याद राखा, असे धमकावले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पोलिस ठाण्यात गर्दी करीत कारवाईची मागणी केली. त्यामुळे मध्यरात्री नाशिक पोलिस ठाण्यात प्रचंड गर्दी झाल्याने तणाव निर्माण झाला होता. (Shinde Group's leader shivaji chumbhale threaten congress MLA hiraman Khoskar)
नाशिक (Nashik) बाजार समिती निवडणूक (APMC Election) सातत्याने वादात आहे. न्यायालयीन खटल्यांनंतर आता ती पोलिस ठाण्यात पोहोचली आहे. काँग्रेस (Congress) आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) यांना धमकी देण्यात आली. महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांनी याबाबत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
नाशिक बाजार समितीच्या निवडणूक प्रचारावरून भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या शेतकरी विकास पॅनलचे नेते शिवाजी चुंभळे यांनी थेट महाविकास आघाडीचे आमदार हिरामण खोसकर यांना मोबाईलवरून धमकी दिली. त्याबाबत तालुका पोलिस ठाण्यात चुंभळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप-शिवसेना शिंदे गट असे चित्र असले, तरी खरी लढत पिंगळे गट विरुद्ध चुंभळे गट अशीच पारंपरिकच लढत होणार आहे. गतपुरीचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर हे पिंगळे गटासोबत प्रचार यंत्रणेत सहभागी झाले आहेत. त्याचा राग मनात धरून भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या शेतकरी विकास पॅनलचे नेते शिवाजी चुंभळे यांनी आमदार खोसकर यांना मोबाइलवरून ठार करण्याची धमकी दिली आहे.
चुंभळे यांचे पुत्र अजिंक्य यांनीदेखील आमदार खोसकरांना धमकी दिली. ‘मतदारसंघात फिरू नको, माझ्या बापाच्या नादी लागू नको, तू अजून आम्हाला ओळखले नाही. आमच्या नादी लागल्यावर काय परिणाम भोगावे लागतील, याचा विचार कर’ अशी धमकी दिली.
दरम्यान, या प्रकारामुळे निवडणुकीला गालबोट लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आदिवासी संघटना रस्त्यावर उतरणार असल्याच जाहीर केले आहे. मतदारसंघातील लाखो लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधीला धमकी दिल्याने आदिवासी संघटनांनी तीव्र निषेध नोंदवला आहे.
चुंभळे पिता-पुत्राला अटक करण्यात यावी, या मागणीसाठी शनिवारी संघटना रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. रात्री उशिरापर्यंत पिंगळे गट, खोसकर यांचे हितचिंतक आणि आदिवासी संघटनांचे प्रतिनिधी तालुका पोलिस ठाण्यात तळ ठोकून होते..
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.