Daund News : ठाकरे गटाला एकही जागा नाही; शिवसेना राष्ट्रवादीवर नाराज : संजय राऊतांच्या सभेबाबत संभ्रम

शिवसेनेकडून एकही मतदान नाही. त्यामुळे आम्ही त्यांना उमेदवारी दिलेली नाही.
Sanjay Raut, Ramesh Thorat, Mahesh Pasalkar
Sanjay Raut, Ramesh Thorat, Mahesh PasalkarSarkarnama

केडगाव (जि. पुणे) : दौंड (Daund) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Bazar Samiti) निवडणुकीत आघाडीत बिघाडी झाल्याचे आज स्पष्ट झाले. राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला (Shivsena) बाजार समिती निवडणुकीत एकही जागा दिली नाही. कार्यकर्त्यांनी ही तक्रार शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या कानावर घातली. परिणामी राऊत यांनी दौंडमधील २६ एप्रिल रोजी होणारी सभा रद्द केल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी दिली, तर दौंडचे माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे नेते रमेश थोरात यांनी ही सभा होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. (Confusion about MP Sanjay Raut's Sabha in Daund)

खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थक आमदारांना चोरमंडळ म्हटल्याने त्यांच्यावर कारवाईसाठी हक्कभंग समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी भीमा पाटस कारखान्याचे अध्यक्ष तथा दौंडचे भाजपचे आमदार राहुल कुल यांची निवड झाली आहे. त्यानंतर काही दिवसांतच राऊत यांनी भीमा कारखान्यात ५०० कोटींचे गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. कुल यांचा भ्रष्टाचार उघड करण्यासाठी कुल विरोधकांनी संजय राऊत यांची भेट घेऊन त्यांना सभेसाठी दौंडमध्ये पाचारण केले होते. ही सभा दौंडमध्ये २६ एप्रिल रोजी होणार होती. राऊत यांच्या सभेची दौंडमध्ये मोठी उत्सुकता होती.

Sanjay Raut, Ramesh Thorat, Mahesh Pasalkar
Ajit Pawar Interview : ‘शिंदेंच्या गाड्या थेट मातोश्रीवर आणा’; पण अधिकारी ‘लॉयल’ राहिला अन्‌ सत्ता परिवर्तन झाले! : अजितदादांनी उलगडला सूरतचा रस्ता

दरम्यान, बाजार समिती निवडणुकीत जिल्हा प्रमुख पासलकर यांनी एक जागा मागितली होती. मात्र, एकही जागा मिळाली नसल्याने शिवसैनिक नाराज झाले आहेत. राऊत व पासलकर यांच्यात झालेल्या चर्चेतून सभा रद्द करण्यात आली आहे, असे सांगण्यात येत आहे.

Sanjay Raut, Ramesh Thorat, Mahesh Pasalkar
Rahul Kul News : दौंड बाजार समिती: राहुल कुलांनी रमेश थोरातांविरुद्ध थोपटले दंड; म्हणाले...

यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश थोरात यांनी म्हटले की, पासलकर यांच्याकडे एकही मतदान नाही. त्यामुळे आम्ही त्यांना उमेदवारी दिलेली नाही. कोणत्याही परिस्थितीत संजय राऊत यांची सभा ठरल्यानुसार होणार आहे. माझे आज दुपारी संजय राऊत यांच्याशी बोलणेही झाले आहे.

पासलकर यांनी मोबाईल स्टेटसवर 'ज्यांनी आमचा विचार केला नाही, त्यांचा आम्ही पण विचार करणार नाही.' 'खासदार संजय राऊत यांची सभा तूर्तास रद्द' अशा पोस्ट व्हायरल केल्या आहेत, त्यामुळे संजय राऊत यांच्या सभेबाबत दौंडमध्ये उत्सुकता ताणली गेली आहे.

Sanjay Raut, Ramesh Thorat, Mahesh Pasalkar
Pandharpur Politic's : परिचारकांच्या मुत्सद्देगिरीला काळे-भालकेंकडून राजकीय शहाणपणाची टाळी; अभिजीत पाटलांचा आमदारकीच्या तयारीचा शड्डू

दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार व संजय राऊत यांच्यात मागील काही दिवसांपासून मतभेद निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राऊत सभेला येतील की नाही, याबाबत साशंकता होती. मात्र आज थोरात व पासलकर यांच्या वक्तव्यांवरून सभेबाबत संभ्रमावस्था तयार झाली आहे. आता यात थोरात बाजी मारणार की पासलकर तसेच संजय राऊत कुणाचे ऐकणार याबाबत उत्सुकता लागली आहे. थोरात व पासलकर यांच्या विरोधी वक्तव्यांवरून दौंड भाजपमध्ये खुषीचे वातावरण आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com