भाजपला आव्हान देणाऱ्या `एमआयएम`ला एकनाथ शिंदे ५५८ कोटींचे ‘गिफ्ट’ देतील का?

आमदार शाह यांचे अतिक्रमण, पाणीप्रश्‍नी महापालिकेवर टीकास्त्र
Eknath Shinde & Faruk Shah
Eknath Shinde & Faruk ShahSarkarnama
Published on
Updated on

धुळे : नगरोत्थान योजनेतून देवपूरसाठी (Dhule) आणखी ३० कोटींचा (30 Cr. fund for Dhule) निधी आणला असून, शहर विकासात (City Devolopment) धुळेकरांसाठी अमृत योजनेतंर्गत तब्बल ५५८ कोटींचा निधी व हद्दवाढीतील गावांसाठी १२२ कोटींच्या निधीचा प्रस्ताव सादर केला आहे. तो दिवाळीपूर्वी मंजूर करून आणणार असल्याची माहिती आमदार फारुक शाह (MLA Faruk Shah) यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. (CM Eknath shinde will sanction 558 Cr. for Dhule)

Eknath Shinde & Faruk Shah
Jalgaon News: गुलाबरावांपुढे पुन्हा एकनाथ खडसेंचे चे आव्हान!

विशेष म्हणजे आमदार शाह सातत्याने भारतीय जनता पक्षाच्या कामकाजावर टिका करीत आले आहेत. विशेषतः धुळे महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने `एमआयएम` महापालिकेतील भाजपच्या कार्यशैलीवर सतत टिका करीत असतात. भाजपशी वैर घेणाऱ्या आमदार फारूक शाह यांच्यावर मुख्यमंत्री शिंदे मेहेरबान झाल्याचे चित्र आहे.

Eknath Shinde & Faruk Shah
Shivsena: सीबीआय चौकशीसाठी शिवसेनेचे चक्क स्मशानभूमीत उपोषण;

आमदार शाह यांनी महापालिकेसह आयुक्तांवर टीकास्त्र सोडत सांगितले, त्यांचा प्रशासनावर वचक नाही. कुठलीही ठोस कार्यवाही त्यांच्याकडून होत नाही. आयुक्तांवर लवकरच शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. देवपूरसाठी तीस कोटींचा निधी आणूनही मनपाने अपेक्षित कामांचा प्रस्ताव तयार केला नाही. हा विषय सभेत घेतलेला नाही. हद्दवाढीतील गावांसह अमृत- २ योजनेतंर्गत शहरासाठी निधीची मागणी केली असून, मुख्यमंत्र्यांनी ती मंजूर करण्याचे आश्वासन दिले आहे. यात ५५८ कोटींच्या निधीत ३३ टक्के केंद्र, ३३ टक्के राज्य शासनाचा हिस्सा आणि उर्वरित मनपाचा राहील.

अतिक्रमणांचा मुद्दा हाताळत आमदार शाह म्हणाले, शहरातील पाणीप्रश्न गंभीर असून अनेक भागात दहा ते पंधरा दिवस पुरवठा होत नाही. मुबलक जलसाठा असूनही नियोजनशून्य कारभारामुळे धुळेकरांना हा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत प्रधान सचिवांना पत्र दिले असून, लवकरच मंत्रालयस्तरवर बैठक घेतली जाईल. जुन्या जिल्हा रूग्णालयात आणखी शंभर बेड वाढवून दोनशे बेडचे रूग्णालय सुरू केले जाईल.

साक्री रोडवरील मोतीनाल्याचे रुंदीकरण केले जाणार असून, त्यासाठी निधीही आणला आहे. आतापर्यंत स्थानिक विकास निधीतून ८० दिव्यांगाना तीन चाकी सायकलीचे वाटप केले. तसेच अनेक दिव्यांगांना पिवळ्या रेशन कार्डचे वाटप केले. तसेच अनेक रस्त्यांची कामे झाली असून काही कामे सुरू आहेत. पत्रकारांच्या काही प्रश्‍नांवर पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका करताना त्यांनी अगोदर ५० आणि आता ६० नगरसेवक होतील, असे भाकीत केल्याने भाजपचे नगरसेवक निवांत दिसत असून, त्यांना आता काहीही करण्याची गरज भासत नसल्याची टीकाही आमदार शाह यांनी केली.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com