मनमाड : मनमाड शहर पोलिसांनी (Manmad Police) खोटा गुन्हा दाखल (Bogus FIR) केल्याचा आरोप करीत या गुन्ह्याची आता सीबीआय चौकशी (CBI Inquiry) केली जावी, या मागणीसाठी शिवसेनेचे (Shivsena) नाशिक (Nashik) जिल्हा सहसंपर्क प्रमुख प्रवीण नाईक यांनी स्मशानभूमीत धरणे आंदोलन सुरू केले. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा देण्यात आला. (Shivsena deemands inquiry of RPF bogus FIR against Shivsena workers)
निवेदनात म्हटले आहे की, रेल्वेरुळालगत आपले शेत असून, २ सप्टेंबर रोजी शेतातून घरी जात असताना रेल्वे कामगारांनी रेल्वे रुळावर एका व्यक्तीने आत्महत्या केल्याचे सांगितले.
याबाबत प्रभारी पोलिस निरीक्षक प्रल्हाद गीते यांच्याशी संपर्क केला. त्याचवेळी घटनास्थळी आरपीएफ जवान आला असता त्यांना पोलिसांशी बोलण्याबाबत सांगितले. त्यावर त्याने नकार दिला. परंतु, घरी आल्यानंतर माझ्यावर ३५३ चा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. या खोट्या आरोपाने आपण खचलो असून, या गुन्ह्याची सीबीआय चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई करावी, यासाठी स्मशानभूमीत धरणे आंदोलन सुरु केल्याचे म्हटले आहे. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले.
या वेळी माजी आमदार जगन्नाथ धात्रक, राजेंद्र देशमुख, जिल्हा उपप्रमुख संतोष बळीद, जिल्हा संघटक संजय कटारिया, तालुकाप्रमुख संतोष गुप्ता, शहरप्रमुख माधव शेलार, माजी नगराध्यक्ष दिलीप सोळसे, विनय आहेर, दिलीप तेजवानी, कैलास गवळी, संजय गवळी, दिनेश केकान, स्वराज देशमुख, यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
----
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.