Police Transfer News : निवडणूक आयोगाचा दणका; 59 पोलिस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Lok Sabha Election 2024 and Election Commission : नियम डावलून केलेल्या बदल्या रद्द करत नव्याने बदल्या करण्याच्या निवडणूक आयोगाच्या सूचना
ECI, Maharashtra Police
ECI, Maharashtra PoliceSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : निवडणूक आयोगाच्या दणक्यानंतर नाशिक परीक्षेत्रातील विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे हे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेबाबत चांगलेच अॅक्टीव्ह झालेले आहेत. नाशिक परीक्षेत्रातील 59 पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदलीचा आदेश काढण्यात आला आहे. यात नगर जिल्ह्यातील १५ पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी परीक्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. राज्य सरकारने यानंतर राज्यातील प्रमुख आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यात बी. जी. शेखर यांची देखील बदली झाली. परंतु त्यांनी बदलीविरोधात कॅटकडे अपील केले आहे.

ECI, Maharashtra Police
Manoj Jarange News : जरांगेंचा फडणवीसांवर जीवे मारण्याचा आरोप; बच्चू कडूंचा सबुरीचा सल्ला, म्हणाले...

दरम्यान, नाशिक (Nashik) परीक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षकाचा पदभार दत्तात्रय कराळे यांनी घेतला आहे. दत्तात्रय कराळे हे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्टीव्ह झालेत. यात त्यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या बदल्या पुन्हा नव्याने केल्या आहेत. काही पोलिस अधिकारी हे स्वतःच्याच जिल्ह्यात होत, तर काही अधिकारी हे तीन वर्षे झाले तरी जिल्हा सोडायला तयार नव्हते. अशा ५९ पोलिस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी केल्या आहेत.

ECI, Maharashtra Police
Manoj Jarange Live : 'सागर बंगल्यावर येतो, आता गोळ्या घाला' म्हणत मनोज जरांगे मुंबईकडे रवाना

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (ECI) निर्देशांनुसार ज्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या नाहीत, त्या रद्द करून नव्याने बदल्या करा, असा आदेश निवडणूक आयोगाने महासंचालक कार्यालयाला दिले होते. त्यानुसार बदलीस पात्र असून जिल्ह्यात असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. चार वर्षातील सेवाकाळात एकाच जिल्ह्यात तीन वर्षे व त्यापेक्षा अधिक सेवा झालेले तसेच स्वतःचा जिल्हा असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, तरीही काही अधिकाऱ्यांना अकार्यकारी पदावर नियुक्त्या देण्यात आल्या होत्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ECI, Maharashtra Police
Jarange Vs Fadnavis : जरांगे-पाटलांचे गंभीर आरोप, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

या प्रकाराच्या काही तक्रार निवडणूक आयोगाला प्राप्त झाल्या होत्या. त्याची निवडणूक आयोगाने दखल घेत महासंचालकांना संबंधित पोलिस अधिकाऱ्यांविरोधात कार्यवाहीच्या सूचना केल्या. तसेच नियम डावलून केलेल्या बदल्या रद्द करत नव्याने बदल्या करा, अशा सूचना आयोगाने केल्या. विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी याची दखल घेत नाशिक परीक्षेत्रातील 59 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यात 15 पोलिस अधिकारी हे नगर जिल्ह्यातील आहेत. (Police Transefer)

या अधिकाऱ्यांच्या झाल्यात बदल्या...

नगर पोलिस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आलेल्या निरीक्षक ज्योती गडकरी आणि जिल्हा विशेष शाखेतील निरीक्षक विजय करे यांचा नगर जिल्ह्यातील सेवाकाळ तीन वर्षे झाला आहे. तरी देखील त्यांच्या बदलीबाबत नियम डावलण्यात आला होता. आता या दोघा अधिकाऱ्यांच्या बदल्या नाशिक ग्रामीणमध्ये करण्यात आली आहे. तसेच नाशिक ग्रामीणमधील पोलिस निरीक्षक रवींद्र मगर आणि नंदूरबारमधील भरत जाधव हे नगरमध्ये बदलवून आले आहेत. नाशिक ग्रामीणमधून सहायक निरीक्षक शिवाजी तांबे, एकनाथ ढोबळे, मयूर भामरे, वर्षा जाधव यांची नगरमध्ये बदली झाली आहे. याशिवाय नऊ पोलिस उपनिरीक्षकांच्या नगरमध्ये बदल्या करण्यात आल्या आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

ECI, Maharashtra Police
Manoj Jarange Vs Devendra Fadnavis : पाटील... पाटील... दादा.. दादा...; जरांगेंना शांत करता-करता आंदोलकांची दमछाक

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com