Shirdi Lok Sabha Election : उत्कर्षा रूपवतेंनी 'हात' सोडला; काँग्रेसला झटका अन् ठाकरे गटाला धडकी...

Lok Sabha Election 2024 :रूपवते या निवडणुकीत उतरल्या तर आघाडीला मिळू शकणाऱ्या मतांची विभाजन होऊ शकते, अशी शक्यता आहे .
Shirdi Lok Sabha Election
Shirdi Lok Sabha ElectionSarkarnama
Published on
Updated on

Shirdi News : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळीची सुरू असतानाचा काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या नेत्या उत्कर्षा रूपवते यांनी पक्षाचा 'हात' सोडला आहे. त्यांना काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. शिर्डीची जागा ठाकरे गटाला सोडल्याने रूपवते या नाराज होत्या. ही जागा काँग्रेसला मिळावी, अशी त्यांची आग्रही मागणी ठाम मागणी होती. मात्र आता त्यांनी राजीनामा अस्त्र उगारले आहे. (Lok sabha Election 2024)

Shirdi Lok Sabha Election
NCP News: दक्षिण महाराष्ट्रातून ‘घड्याळ’ गायब ; पुणे जिल्ह्यात दोनच ठिकाणी उमेदवार रिंगणात

रूपवते यांना शिर्डीतून लढायची इच्छा होती. मात्र आता महाविकास आघाडीची संधी गेल्यामुळे आता त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. आता त्या प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत (VBA) त्या सामील होण्याची शक्यता आहे. आज त्या अकोल्यात दाखल झाल्या असून आज रात्री उशिरा त्यांचा वंचितमध्ये प्रवेश होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा, अशी त्यांची आग्रही मागणी होती. मात्र, जागावाटपात शिर्डी (Shirdi Loksabha) ठाकरे गटाच्या वाट्याला आल्याने उत्कर्षा रूपवते नाराज झाल्या होत्या. त्यांना या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा होती. त्यामुळे आता काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन उत्कर्षा रूपवते या प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत (VBA) प्रवेश करण्याची शक्यता आहे. उत्कर्षा रूपवते या अकोल्यात दाखल झाल्या असून आज रात्रीच त्यांचा पक्षप्रवेश पार पडण्याची शक्यता आहे.

शिर्डीमधून शिंदे गटाचे सीटिग खासदार सदाशिव लोखंडे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून भाऊसाहेब वाकचौरे यांच्यात 'हाय व्हाल्टेज' सामना होणार आहे. मात्र आता वंचितकडून रूपवर्ते यांना उमेदवारी मिळाली तर इथे तिरंगी लढत होणार आहे. रूपवर्ते यांनी शड्डू ठोकला तर याचा फटका ठाकरेंच्या (Uddhav Thacketay) उमेदवाराला बसू शकतो.

Shirdi Lok Sabha Election
Ramdas Athawale News: 'शिर्डी आठवलेंना सोडा, अन्यथा मावळ अन् शिरुरमध्ये...'; 'आरपीआय'च्या नेत्याचा इशारा
Shirdi Lok Sabha Election
Loksabha Election 2024 : विखे, लंके, लोखंडे, वाकचौरे यांची बंडखोर अन् अपक्ष उमेदवार वाढवणार डोकेदुखी!

शिर्डी लोकसभा (Lok Sabha) हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. पूर्वी येथे काँग्रेसचा उमेदवार सातत्याने निवडून असा मतदारसंघ हा राखीव आहे. मात्र 2009 च्या लोकसभा निवडणुकीनंतर शिर्डीची शिवसेना जिंकत राहिली. 2014 मध्ये भाऊसाहेब वाकचौरे हे शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. मात्र शिवसेनेच्या सदाशिव लोखंडेंनी त्यांना पराभवाची धूळ चारली होती. आता मात्र वाकचौरे पुन्हा एकदा ठाकरेंकडे आले आहेत. रूपवते या निवडणुकीत उतरल्या तर आघाडीला मिळू शकणाऱ्या मतांची विभाजन होऊ शकते, अशी शक्यता आहे .

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com