Loksabha Election 2024 : विखे, लंके, लोखंडे, वाकचौरे यांची बंडखोर अन् अपक्ष उमेदवार वाढवणार डोकेदुखी!

Nagar and Shirdi Lok Sabha constituencies : नगर व शिर्डी लोकसभा मतदार संघाची प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया गुरुवारपासून सुरू होणार आहे. 18 ते 25 एप्रिलपर्यंत उमेदवारी दाखल करण्याची मुदत आहे.
Nagar and Shirdi Lok Sabha constituencies
Nagar and Shirdi Lok Sabha constituenciesSarakarnama
Published on
Updated on

Nagar and Shirdi Lok Sabha election news : लोकसभेच्या निवडणुका जाहीर होऊन तब्बल महिना झाला आहे. नगर दक्षिणेतून महायुतीचे विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे व महाविकास आघाडीकडून पारनेरचे माजी आमदार नीलेश लंके तर शिर्डी राखीव मतदार संघातून महायुतीचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे व महाविकास आघाडीकडून भाऊसाहेब वाकचौरे असे चार उमेदवार निश्चित झाले आहेत. उद्या गुरुवारपासून प्रत्यक्ष सुरू होणार्‍या रणधुमाळीत कोणी बंडखोर येते का व किती अपक्ष नशीब आजमावतात, याची उत्सुकता आहे.

नगर व शिर्डी लोकसभा मतदार संघाची प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया उद्या गुरुवारपासून (ता. 18) सुरू होणार आहे. 18 ते 25 एप्रिलपर्यंत उमेदवारी दाखल करण्याची मुदत आहे. 26 एप्रिलला अर्जांची छाननी होईल. 29 एप्रिलपर्यंत उमेदवारी मागे घेण्याची मुदत आहे आणि 13 मे रोजी मतदान होणार आहे. यानंतर तीन आठवड्यांनी म्हणजे चार जूनला मतमोजणी होईल. नगरची प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयात तर शिर्डीची प्रक्रिया राहाता येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात होईल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nagar and Shirdi Lok Sabha constituencies
Sharad Pawar News : खासदार विखेंना घरी बसवण्यासाठी शरद पवार मैदानात, विरोधकांची धाकधूक वाढली

लोकसभा निवडणुकीसाठी 16 मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेच्या बंधनामुळे निवडणूक अधिकार्‍यांच्या दालनात शक्तिप्रदर्शन करण्यावर निर्बंध आहेत. केवळ तीन वाहनांतून उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी यावे लागणार आहे. निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या दरानुसारच उमेदवारांना दैनंदिन खर्च सादर करावा लागणार आहे. या खर्चाचे स्वतंत्र यंत्रणेमार्फत ऑडिट होणार आहे.

विखेंचा अर्ज दाखल करण्याचा मुहूर्त ठरला -

नगर व शिर्डी या दोन्ही मतदारसंघात उमेदवारी दाखल करण्यासाठी मुहूर्त पाहण्यासाठी उमेदवारांच्या समर्थकांची धावाधाव सुरू आहे. नगर दक्षिण मतदार संघात डॉ. विखे यांचा उमेदवारी अर्ज हनुमान जयंतीच्या दिवशी 23 एप्रिलला दाखल होणार आहे. तर त्यांचे प्रतिस्पर्धी नीलेश लंके यांचा अर्ज कधी दाखल होणार, याची तारीख निश्चित नाही. शरद पवार 19 एप्रिलला नगरला येणार असून, त्यावेळी त्यांच्या उपस्थितीत किंवा 23 रोजी हनुमान जयंतीलाच अर्ज भरण्याचे लंकेंचे नियोजन असल्याचे समजते.

नगर व शिर्डी या दोन्ही मतदारसंघात मागील महिनाभरापासून प्रचाराचा धुरळा उडाला आहे. उद्यापासून उमेदवारी दाखल करण्यात सुरुवात झाल्यानंतर प्रचाराला आणखी जोरदार तडका मिळणार आहे. नगरमध्ये महायुतीतील भाजपचे विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे व महाविकास आघाडीतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार नीलेश लंके यांच्यात लढत आहे. शिर्डीमध्ये विद्यमान खासदार व महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे व महाविकास आघाडीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे या चौघांमध्येच प्रमुख लढत आहे.

Nagar and Shirdi Lok Sabha constituencies
Chhagan Bhujbal News: महायुतीच्या उमेदवारीबाबतच्या गोंधळामुळे छगन भुजबळ संतापले, म्हणाले...

'वंचित'च्या भूमिकेकडे लक्ष -

नगर दक्षिणेत महायुती वा महाविकासकडून कोणी बंडखोरी करण्याची शक्यता नाही. मात्र, वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार रिंगणात येऊ शकतो. शिर्डीत महाविकास आघाडीत बंडखोरीची शक्यता आहे. राज्य महिला आयोगाच्या सदस्य व काँग्रेसच्या नेत्या उत्कर्षा रुपवते यांची उमेदवारी अपेक्षित असून, त्यांचा अर्ज रिंगणात दाखल झाला, तर ती महाविकास आघाडीतील बंडखोरी ठरू शकते. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचाही उमेदवार शिर्डीच्या रिंगणात अपेक्षित आहे. मागच्या 2019 च्या निवडणुकीत 'वंचित'च्या उमेदवाराने 60 हजारावर मतं घेतली होती. मात्र, यावेळी रुपवते यांनी बंडखोरी केली तर वंचित आघाडी त्यांना पाठिंबाही देऊ शकते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com