Uddhav Thackeray Birthday : रक्तातनं साकारलं उद्धव ठाकरेंचं चित्र; शिवसैनिकांचा भगवा फडकवण्याचा संकल्प

Resolution to win Ahmednagar City assembly on Uddhav Thackeray birthday : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नगरमधील शिवसैनिकांनी आपल्या रक्तातून उद्धव ठाकरे यांचे रेखाचित्र तयार करून घेतले. नगर शहर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा संकल्प नेते, पदाधिकाऱ्यांनी केला.
Uddhav Thackeray Birthday
Uddhav Thackeray BirthdaySarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : शिवसेनेला नगर शहर विधानसभा मतदारसंघात सलग दोन पराभव झाला. शिवसेनेला हा पराभव जिव्हारी लागलाय. यातच शिवसेना फुटली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वेगळा झालाय. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस राज्यात साजरा होत आहे. नगर शहरातील शिवसेना नेत्यांनी एकत्र येत नगर शहर विधानसभेवर भगवा फडकवण्याचा निर्धार केला.

शिवसेना नेते, पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवकांनी रक्तातून उद्धव ठाकरे यांचे चित्र रेखाटले. 'नगर शहरात यावेळी भगवा फडकवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असा निर्धार शिवसैनिकांनी केली असून, त्याला उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून विजयाला आकार देखील", असा विश्वास युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा वाढदिवस विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होत असल्याने राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे. मुंबईत आणि राज्यात त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनरबाजी सुरू आहे. महाविकास आघाडीत आता जागा वाटपावर चर्चा सुरू आहे. शिवसेना फुटीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळवले. यामुळे विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे पक्षात इच्छुकांची संख्या वाढली आहे. शिवेसना ठाकरे पक्षाकडे ज्या जागा पहिल्यापासून आहेत, तिथे देखील इच्छुकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे पक्षात तिकीट वाटपावरून घामासान होण्याचे चिन्हं आहेत. यात पक्षावर नाराजींची संख्या वाढू शकते. यातून मार्ग काढण्याची कला उद्धव ठाकरेंना दाखवावी लागणार आहे.

Uddhav Thackeray Birthday
Radhakrishna Vikhe : महाविकास आघाडीचा ढोंगीपणा उघडा पाडा; मंत्री विखेंच्या भाजप शक्तीकेंद्र प्रमुखांना सूचना

नगर विधानसभा निवडणुकीचा जागा अंतर्गत नाराजांमुळेच दोन शिवसेनेतील (Shiv Sena) नाराजांमुळे गेली. शिवसेना पक्षातील गद्दारीनंतर उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता उद्धव ठाकरे यांचा वाढदिवशी राज्यात शिवसैनिक साजरा करत असतानाच शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून त्यांच्यावर टीका करत आहे. विरोधकांची टीका होत असताना नगर शहर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवस एकत्र येत साजरा केला. उद्धव ठाकरे यांचे चित्र शिवसैनिकांनी त्यांच्या रक्तातून तयार केले. नगर शहरावर यंदा शिवसेनेचा भगवा कोणत्याही परिस्थिती फडकवायचा, असा संकल्प पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला.

Uddhav Thackeray Birthday
Balasaheb Thorat Politics: काँग्रेसचा मोठा डाव, सिन्नरमधून बाळासाहेब थोरात यांची उमेदवारी?

शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, युवा सेना सहसचिव विक्रम राठोड, संजय शेंडगे, बाळासाहेब बोराटे, गिरिष जाधव, योगिराज गाडे, गणेश कवडे, दत्ता जाधव, दत्ता कावरे, सचिन शिंदे, शाम नळकांडे, संतोष गेनप्पा, विजय पठारे, अक्षय नागापुरे उपस्थित होते. कलाकार गणेश जिंदम यांनी हे रेखाचित्र रेखाटलं.

संभाजी कदम म्हणाले, "शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यसह देशात शिवसेना वाढत आहे. राज्याबरोबर देशाचे कुटुंबप्रमुख म्हणून पुढे आले आहेत. कोरोना काळातील त्यांच्या कार्याची दाखल देशाने घेतली". लोकसभा निवडणुकीतही त्यांचा करिष्माने दिसला. विधानसभेत त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार आहेत, असे सांगितले. विक्रम राठोड, भगवान फुलसौंदर, बाळासाहेब बोराटे, गिरिष जाधव यांनी शिवसेना ठाकरे पक्षच खरा असून, गद्दारांना यावेळी विधानसभा निवडणुकीत धडा शिकवण्याचा निर्धार व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com