Murder Case : बीडनंतर आता जळगावही हादरलं! दिवसाढवळ्या शिवसेनेच्या माजी उपसरपंचाची हत्या

Shiv Sena EX Deputy Sarpanch Yuvraj Koli Murdered : डीवायएसपी कृष्णांत पिंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपासाचे आदेश दिले आहेत. तसेच जळगाव जिल्हाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी युवराज यांच्या हत्येविषयी बोलताना दु:ख व्यक्त केलं.
Murder Case
Murder Casesarkarnama
Published on
Updated on

गणेश सोनवणे

Crime News : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच आता उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा माजी उपसरपंचाच्या हत्येने हादरला आहे. जळगाव जिल्ह्यातील कानसवाडे गावात किरकोळ वादातून शिंदे गटाच्या माजी उपसरपंचाची तिघांनी धारदार शस्राने हत्या केली आहे. दरम्यान आरोपींच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत.

युवराज सोपान कोळी (३५) असे हत्या झालेल्या माजी उपसरपंचाचे नाव आहे. ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य होते. आज शुक्रवार( ता.21) सकाळी आठच्या सुमारास अज्ञात तिघांनी त्यांच्या छातीत धारदार शस्राने वार करुन त्यांचा निर्घुण खून केला. युवराज हे आईवडिल, तीन मुलं व पत्नी यांच्यासह वास्तव्यास होते. शेती करुन ते आपलं कुटुंब चालवत होते. युवराजचे गुरुवारी रात्री एका हॉटेलमध्ये काही जणांशी किरकोळ कारणावरुन वाद झाले होते. याच वादातून त्याची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Murder Case
Disha Salian death case : दिशा सालियन मृत्यू प्रकरणावर सुशांतच्या वडिलांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, "आधीच्या सरकारमध्ये..."

काही शेतकऱ्यांच्या समोरच ही घटना घडली. त्यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली मात्र तोपर्यंत मारेकरी हत्या करुन पसार झाले होते. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कोळी यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. यावेळी मयत कोळी यांच्या नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला.

दरम्यान , डीवायएसपी कृष्णांत पिंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपासाचे आदेश दिले आहेत. तसेच जळगाव जिल्हाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी युवराज यांच्या हत्येविषयी बोलताना दु:ख व्यक्त केलं. तसेच संबधितांवर तातडीने योग्य ती कारवाई व्हायला हवी अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. आजूनही त्यांच्या हत्येची जखम ताजी आहे. असे असताना जळगावात आज झालेल्या या हत्येने पुन्हा एकदा राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या हत्येचे लोण आणखी कुठवर जाते माहित नाही, मात्र पोलिस यंत्रणेपुढे हे सर्व थांबवणं मोठे आव्हान आहे. कानसेवाडे सारख्या गावात दिवसाढवळ्या झालेल्या या हत्येने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी हल्लेखोरांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Murder Case
Chitra Wagh Controversy : म्हणे, असे 56 पायाला बांधून फिरते...! वरिष्ठांच्या सभागृहाने शरमेने मान खाली घातली असणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com