Sanjay Raut : 'मोदी फक्त दोघांना घाबरतात, एक शेतकरी अन् दुसरे ठाकरे'; संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut On PM Modi: "तुम्ही पंतप्रधान आहात, झाडू काय मारता ? शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा..."
Uddhav Thackeray, Sanjay Raut,PM Modi
Uddhav Thackeray, Sanjay Raut,PM ModiSarkarnama
Published on
Updated on

Nashik News: 'राम एकवचनी होते, यांना वचन पाळायची सवयच नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हमी भाव देण्याचे वचन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले होते. त्या वचनाचे काय झाले ? 15 लाख रूपये परत देण्याचे काय झाले ?', असे प्रश्न उपस्थित करीत देशात नरेंद्र मोदी फक्त शेतकरी आणि ठाकरेंना घाबरतात, अशी टीका शिवसेना नेते (उद्धव ठाकरे गट) संजय राऊत यांनी केली. ठाकरे गटाच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानातील जाहीर सभेत राऊत बोलत होते.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भाव देण्याचे वचन दिले होते. त्याचे काय झाले, हे मोदींनी सांगावे. मोदी नाशिक दौऱ्यावर आले, त्यावेळी त्यांनी मंदिरात झाडू मारला. तुम्ही पंतप्रधान आहात, झाडू काय मारता ? तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा. राम मुर्ती प्रतिष्ठापणनेसाठी 11 दिवस त्यांनी व्रतवैकल्य केले. पंतप्रधान मंदिरात ब्लँकेटवर झोपले. देशातील 40 कोटी जनता रस्त्यावर झोपते तर, 80 कोटी जनता अर्धपोटी झोपते. यांचे प्रश्न कोण सोडवणार ? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uddhav Thackeray, Sanjay Raut,PM Modi
Loksabha Election 2024 : महायुतीच्या मेळाव्यानंतर आता महाविकास आघाडीची परीक्षा!

आयोध्येत श्री राम मूर्तीकडे पाहून मोदी रडत होते. पण निवडणुका आल्या की हा माणूस रडतो. मग पुलवामामध्ये 40 सैनिक शहीद झाले. तेव्हा त्यांना अश्रू का आले नाही. महाराष्ट्रात अवघ्या दोन वर्षात दोन हजार शेतकऱ्यांची आत्महत्या झाल्यात. तेव्हा त्यांचे अश्रू कोठे गेले. राजकारणात निवडणुका आल्या की मगरीचे अश्रू वाहतात. हजारो कोटींचा भ्रष्टाचार होतो आणि त्याचमुळे आयोध्येत रामाने डोळे वटारले असतील, असे राऊत म्हणाले.

राम येत असताना महाराष्ट्रात गद्दारांचे राज्य आले हे एक मोठे दुर्दैव आहे. राम मंदिर सोहळ्यापूर्वी त्यांनी अक्षदा वाटल्यात. खरंतर आमचे 15 लाख रूपये वाटले असते तर बरे झाले असते, अशी खोचक टीका राऊत यांनी केली. 2014 साली महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वचन दिले होते. मात्र, ते वचन पाळले नाही.

त्यामुळे महाराष्ट्रात नव्हे तर देशात मोदी फक्त शेतकऱ्यांना आणि ठाकरेंना घाबरतात. आज त्याचमुळे शेतकरी व कष्टकरी ठाकरेंच्या पाठीशी उभे आहेत. मोदी दौऱ्यात शेतकऱ्यांना अटक केली. नजरकैदेत टाकण्यात आले. अशी जुल्मी राजवट उलथावून टाकण्याची जबाबदारी सर्वांची आहे. नाशिकला शिवसेनेला यश मिळतांना दिसले अन् मिंदे गटला मिर्च्या झोंबल्यात, असे राऊत म्हणाले.

(Edited By : Ganesh Thombare)

Uddhav Thackeray, Sanjay Raut,PM Modi
Balasaheb Thackeray Birth Anniversary : बाळासाहेबांनी, गिरणी कामगाराच्या मुलाला उमेदवारी दिली अन् मंत्रीही केलं...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com