Raj Thackeray : लोकसभेच्या निकालानं सर्वांना जमिनीवर आणलं, राज ठाकरेंच्या वक्तव्यावर अजितदादांचे नेते म्हणाले...

Raj Thackerays Lok Sabha Election Result : "लोकसभा निवडणुकीच्या निकालाने सर्वांना जमिनीवर आणलं आहे. या निकालातून तरी आपण काही बोध घेणार आहोक का? हे पाहणं गरजेचं आहे."
Raj Thackeray, Ajit Pawar
Raj Thackeray, Ajit PawarSarkarnama

Sunil Tatkare On Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालावर एका मुलाखतीत परखड भाष्य केलं आहे. यंदाच्या लोकसभेच्या निकालाने सर्वांना जमिनीवर आणलं असल्याचा टोला त्यांनी राजकीय पक्षांना लगावला आहे. तर त्यांच्या याच वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे.

मुलाखतीत बोलताना राज ठाकरे म्हणाले, "लोकसभा निवडणुकीच्या निकालाने सर्वांना जमिनीवर आणलं आहे. या निकालातून तरी आपण काही बोध घेणार आहोक का? हे पाहणं गरजेचं आहे. उद्या कोणी इथून तिथे जातील तिथून इथे जातील, त्यामुळे साधारण आपण वर्षभर कळ सोसू. ज्याप्रकारचा निकाल लागला सगळ्यांना जमिनीवर आणलं आहे."

राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते सुनील तटकरे यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली. पत्रकारांनी राज यांनी निवडणुकीच्या निकालातून आपण काही बोध घेणार आहेत का काही चिंतन करणार आहोत का? असं म्हटल्याचं सांगितलं. यावर बोलताना तटकरे म्हणाले, "म्हणजे त्यांच्यासहित असं त्यांनी सांगितलं आहे." अशी कोपरखळी लगावली.

Raj Thackeray, Ajit Pawar
Abdul Sattar : ...अन् त्यादिवशी मुख्यमंत्र्यांशी माझा करार संपेल; अब्दुल सत्तारांचं मोठं विधान

ही कसली लोकशाही?

तसंच या मुलाखतीत बोलताना राज (Raj Thackeray) यांनी पदवीधर निवडणुकीसाठी उमेदवार अशिक्षित असला तरी चालतो मात्र मतदार ग्रॅज्युएटच पाहिजे, ही कसली लोकशाही असा प्रश्नही उपस्थित केला. ते म्हणाले, "पदवीधर मतदारसंघातून एक आमदार निवडून येतो.

Raj Thackeray, Ajit Pawar
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंच्या रॅलीला परवानगी देऊ नका; ओबीसी नेत्यांची पोलिसांकडे धाव

त्या उमेदवाराला ग्रॅज्युएट झालेली माणसं मतदान करतात. त्या फॉर्मवर सही किंवा अंगठा असं लिहिलं असतं तो उमेदवार शिक्षित असावा अशी अट नाही, मात्र त्याला मतदान करणारा मतदार मात्र शिक्षितच असावा लागतो ही कोणती लोकशाही आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com