राज्यमंत्री पवारांच्या घरी निघालेल्या काँग्रेस आंदोलकांना अटक

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानावरून काँग्रेसची आक्रमक घोषणाबाजी.
Congress agitation at Nashik
Congress agitation at NashikSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काँग्रेस (Cobgress) विरोधात असभ्य भाषेचा वापर करत महाराष्ट्र (Maharashtra) राज्याचा अवमान केला. तेव्हा भाजपचे खासदार बाके बडवत होते. त्याविरोधात आक्रमक काँग्रेसच्या पदाधिकारी केंद्रीय राज्यमंत्री डॅा भारती पवार (Dr Bharti Pawar) यांच्या निवासस्थानी आंदोलनासाठी निघाले होते. त्यांना अशोक स्तंभ चौकात अडवून पोलिसांनी अटक केली.

Congress agitation at Nashik
भाजप नाशिक महापालिकेत लढणार स्वबळावर

महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ब्रिजकिशोर दत्त यांच्या उपस्थितीत आज काँग्रेस भवन येथे कार्यकर्त्यांची बैठक झाली. अध्यक्षस्थानी शरद आहेर होते. यावेळी श्री दत्त म्हणाले, काँग्रेस पक्ष देशातील जनतेचा आवाज आहे. विरोधात असलो तरीही सामान्यांची बाजू घेत असल्याने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहूल गांधी, प्रियंका गांधी व अन्य सर्व नेते भाजपच्या डोळ्यात सलतात. त्यासाठी ते त्यांच्यावर तत्थ्यहीन टिका करतात.

Congress agitation at Nashik
कोरोना बळींपेक्षा अनुदान मागणीसाठी आले तिप्पट अर्ज!

कोरोना कोळात केंद्र सरकारने अतिशय नियोजनशुण्य व गरीबांचा विचार न करता त्यांना संकटात टाकणारे काम केले. लाखो मजुर, गरीब पायी आपल्या गावी जाण्यास मजबूर झाले. मानवेच्या दृष्टीकोणातून त्यांना भोजन, प्रवासाची सोय करण्याच्या सूचना काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी दिल्या. त्याचे कार्यकर्ते व नेत्यांनी पालन करून गरीबांना मदत केली. मात्र पंतप्रधान मोदी यांनी संसदेत भाषण करताता काँग्रेसने कोरोना पसरविला अशी विवकेशूण्य व राजकीय स्वार्थाची भूमिका घेतली. महाराष्ट्राचा अवमान होत असताना यावेळी भाजपचे महाराष्ट्रातील खासदार व मंत्री बाके वाजवून मोदींचे समर्थन करीत होते. त्यांचा निषेध केला पाहिजे. त्यांना जाब विचारला पाहिजे, असे श्री. दत्त म्हणाले.

त्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी राज्यमंत्री पवार यांच्या निवासस्थानाकडे निघाले. तेव्हा त्यांना अशोक स्तंभ चौकात अडविण्यात आले. माजी मंत्री डॅा.शोभा बच्छाव, शहराध्यक्ष शरद आहेर, बबलु खैरे, नगरेसविका वत्सलाताई खैरे, आशाताई तडवी, नगरसेवक जॅाय कांबळे, राहुल दिवे, सीराजभाई कोकणी, लक्ष्मण धोत्रे, उद्धव पवार, सुरेश मारू, विजय राऊत, दिनेश निकाळे, विजय पाटील, कैलास कडलग, हनिफ बशीर, सुचेता बच्छाव, वसंत ठाकुर, ज्युली डिसूझा आदींसह मोठ्या संख्येने नेते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी आक्रमक होत केंद्र सरकार, पंतप्रधान मोदी व भाजप विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com