जयकुमार रावल यांच्या नाशिकच्या दरबारी राजकारणाला भाजपची वेसन!

नाशिक महापालिका निवडणुकीसाठी गिरीष महाजन यांची नियुक्ती म्हणजे देरसे आये...
Girish Mahajan & Jaykumar rawal
Girish Mahajan & Jaykumar rawalSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : महापालिका (NMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या राजीकय घडामोडींनी भारतीय जनता पक्ष (BJP) खडबडून जागा झाल्याची चिन्हे आहेत. त्याचाच भाग म्हणून महापालिका स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी हायजॅक केलेला पक्ष व दरबारी राजकारणापासून सतर्कता म्हणून जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांचे पंख कातरण्यात आली. नाशिकची पुन्हा सर्व सुत्रे माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या हाती सुपुर्त करण्यात आली आहे.

Girish Mahajan & Jaykumar rawal
शहराध्यक्षांच्या नाकर्तेपणामुळे मी भाजप सोडला!

केंद्रातील सत्तेचा पुरेपुर वापर करून व माध्यमांत वातावरण तापत ठेऊही तळागाळात त्याचा अपेक्षीत परिणाम साध्य करण्यात अडचणी येत आहेत. राज्यातील नगरपालिका व महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला गळती लागली, हा संदेश देखील थोपवता आलेला नाही. त्यामुळे जागे झालेल्या नेत्यांनी आज तातडीने पावले उचलत सबंध राज्यातील संगटानत्मक व निवडणुक रचना बदलण्याचा निर्णय घेतला. दिवसभर तब्बल बारा तास त्यावर खल झाला. त्यातूनच त्यांनी राज्यातील विविध प्रभारी बदलेल. त्यात नाशिकचे प्रभारी असलेले जयकुमार रावल यांच्या अधिकारांना कात्री लावली. महापालिका निवडणुकीचे प्रभारी हा त्यांचा कारभार माजी मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे सुपुर्त करून श्री. रावल यांना त्यांचे सहप्रभारी करण्यात आले आहे. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्ते, नेत्यांत त्याचा गंभीर संदेश गेला आहे.

Girish Mahajan & Jaykumar rawal
देवेंद्र फडणवीसांची पाठ फिरताच भाजप ४ नगरसेवक शिवसेनेत!

यापूर्वी २०१७ मध्ये राज्यात सत्ता असताना श्री. महाजन यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेची निवडणूक झाली. त्यात पहिल्यांदाच नाशिक शहरात भाजपला पुर्ण बहुमत मिळाले व त्यांचे ६६ नगरसेवक विजयी झाले होते. मात्र गेल्या पाच वर्षात महापौर व स्थायी समिती सभापती या महत्वाच्या पदांवरील नियुक्त्या देखील श्री. महाजन यांच्याच कलाने व त्यांनी ठरवलेल्या नेत्यांच्याच झाल्या. अगदी यंदा गणेश गिते यांना सलग दुसऱ्यांदा स्थायी समितीच्या सभापतीची नियुक्ती सर्व अधिकार रावल यांच्याकडे असले तरी श्री. महाजन यांच्या कलानेच झाले. यातून जी नाराजी व घुसमट भाजपमध्ये सुरु झाली होती, ती लपुन राहिलेली नाही.

श्री. रावल गेले वर्षभर काम करीत असताना त्यांनी पक्षाच्या स्थानिक नेत्यांशी, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी फारसा संपर्क ठेवलेला नव्हता. ठराविक पदाधिकारी व नेते हेच त्यांचे कान व डोळे होते. या कालावधीत गणेश गिते सांगतील ती नाशिक भाजपची पुर्वदिशा होती. श्री. रावल यांनी बहुतांश निर्णय श्री. गिते यांच्या कलानेच घेतल्याचे चर्चा पसरली. अगदी शहराध्यक्षांना देखील फारसे विचारात घेतले जात नव्हते, अशी नाराजी वरिष्ठ नेत्यांपर्यंत गेली होती. वरिष्ठांनी यातील नेमकरा संदेश घेत तातडीने पावले टाकली. त्यात गिरीश महाजन यांच्याकडे पुन्हा सर्व सुत्रे आली आहेत. हा निर्णय भाजप व त्यांच्या विरोधकांसाठी राजकीय संदेश देऊन गेला आहे. त्याचा नेमका काय परिणाम होईल लवकरच स्पष्ट होईल.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com