Shivsena: इगतपुरीच्या नगरसेविका सीमा जाधव अपात्र घोषित

जिल्हाधिकारी डी. गंगाथरन यांनी अपात्र ठरवले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे.
Seema Jadhav, Corporator
Seema Jadhav, CorporatorSarkarnama
Published on
Updated on

इगतपुरी : इगतपुरी (Iagatpuri) पालिकेच्या प्रभाग क्र. ८ (अ) मधून निवडून आलेल्या शिवसेनेच्या (Shivsena) नगरसेविका सीमा जाधव (Seema Jadhav) यांना जिल्हाधिकारी डी. गंगाथरन (D. Gangatharan) यांनी अपात्र ठरवले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे. यानिमित्ताने शिवसेनेकडून विरोधकांना काय उत्तर दिले जाते याची उत्सुकता आहे. (Will Shivsena gove proper political reply to there opponent)

Seema Jadhav, Corporator
NMC Election: प्रभागरचना बदलल्याने भाजप शिवसेनेला शह देणार?

याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आला आहे. आदिवासी सेनेचे संस्थापक दि. ना. उघाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केलेल्या निवडणूक विवादानुसार हा आदेश काढण्यात आला. यामुळे इगतपुरी शहरात चर्चेला उधाण आले आहे.

Seema Jadhav, Corporator
Dhule news: आमदार फारूक शाह यांनी बंद पथदिव्यांचे लोकार्पण केले

आदिवासी सेनेचे संस्थापक दि. ना. उघाडे यांनी २०२१ मध्ये जिल्हाधिकारी यांच्याकडे निवडणूक विवाद अर्ज दाखल केला होता. यावर वेळोवेळी सुनावण्या घेऊन दोन्ही पक्षकार आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना बाजू मांडण्याची संधी देण्यात आली.त्यानुसार १९ एप्रिलला अंतिम सुनावणी होऊन विवाद प्रकरण निर्णयासाठी बंद करण्यात आले. या प्रकरणाचा निकाल गुरुवारी जिल्हाधिकारी डी. गंगाथरन यांनी घेतला. त्यांच्या आदेशानुसार इगतपुरी येथील शिवसेना नगरसेविका सीमा जाधव यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे इगतपुरीत स्वागत करताना नगरसेवक उमेश कस्तुरे यांनी ठाकरे सेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत शिंदे गटात प्रवेश केला. त्या नंतर शिवसेनेच्या नगरसेविका यांना अपात्र घोषित केल्याने इंदूलकर गटात खळबळ उडाली आहे. डिसेंबरमध्ये एकहाती सत्ता असलेल्या शिवसेनेला हा मोठा धवका आहे.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com