धुळे महापालिका टक्केवारी अन् भ्रष्टाचारात बरबटली

शिवसेना (ठाकरे गट) शहराध्यक्ष प्रा. शरद पाटील यांनी महापालिकेच्या कामकाजावर टिका केली.
Sharad Patil & Pradeep Karpe
Sharad Patil & Pradeep Karpe Sarkarnama
Published on
Updated on

धुळे : शहरातील (Dhule) नागरी समस्यांबाबत (Civic issues) वकील संघाने (Dhule Bar association) आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर शिवसेनेचे (ठाकरे गट) (Shivsena Eknath Shinde Group) माजी आमदार प्रा. शरद पाटील (Sharad Patil) यांनी वकील संघाला पाठिंबा दिला. महापालिका टक्केवारीसह भ्रष्टाचारात बरबटल्याचा आरोप त्यांनी केला. (Bar Association deemand solution on civic issues in Dhule city)

Sharad Patil & Pradeep Karpe
राज ठाकरेंच्या ड्रिम प्रोजेक्टची महापालिकेने केली दुरावस्था

शहराशी संबंधीत अक्कलपाडा प्रकल्पाबाबत श्री. पाटील यांनी घेतलेल्या टक्केवारीचा हिशेब द्यावा, नंतर मनपावर बोलावे, असा प्रतिहल्ला महापौर प्रदीप कर्पे यांनी चढविला.

Sharad Patil & Pradeep Karpe
सावरकरांच्या जन्मभूमीत राष्ट्रवादीने अब्दुल सत्तार यांची खोक्यांसह तिरडी काढली!

प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी आमदार पाटील म्हणाले, की शिवसेना नागरी समस्यांप्रश्‍नी तीन वर्षांपासून महापालिकेशी भांडते आहे. सामान्य नागरिक कर भरत असूनही त्यांना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध होत नाहीत. रस्ते, स्वच्छता, पथदीप, पाणीप्रश्‍नी शिवसेना आंदोलनातून महापालिकेशी संघर्ष करत आहे. अशाच प्रश्‍नांवर वकील संघाने आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने त्यांना शिवसेनेचा पाठिंबा आहे. अक्कलपाडा प्रकल्पावरून २०१३ मध्ये गुरुत्वाकर्षणाने पाणी आणले गेले असते तर महापालिकेच्या दरमहा विजेच्या सव्वा कोटी रुपयांच्या बिलात दरमहा १५ लाखांची, तर वार्षिक ६० लाखांहून अधिक निधीची बचत झाली असती; परंतु महापालिका टक्केवारीत व भ्रष्टाचारात अडकल्यामुळे विकासकामे होत नाही.

शहरातील भूमिगत गटार, पाणीयोजना, स्वच्छतेचे टेंडर, कोरोनाकाळात बांबू बांधणे आदी अनेक कामांत भ्रष्टाचार असल्याने त्याचा निषेध नोंदवीत वकील संघाला शिवसेनेने पाठिंबा दिला आहे.

शरद पाटील खोटारडे

या पार्श्वभूमीवर महापौर कर्पे म्हणाले, की खोटे आरोप करणे, महापालिकेची बदनामी करणे इतकेच शिवसेनेला काम उरले आहे. शिवसेनेला महापालिकेच्या निवडणुकीवेळी व आताही जनाधार लाभलेला नाही. शहरात कुठल्याही मुद्द्यावर राजकारण करणे व खोटे बोलणे एवढाच उद्योग शिवसेना करत आहे. या पक्षाचा केवळ एकच नगरसेवक शहरात निवडून आला, तोही त्याच्या स्वकर्तृत्वावर जिंकला. मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या सत्तेत किती टक्केवारीचा खेळ चालतो, त्यात ही महापालिका किती अडकली आहे हे तिथे जाऊन माजी आमदार पाटील यांनी पाहावे.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com