Chandrakant Patil Accident: मोठी बातमी! शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटलांच्या गाडीचा अपघात

Chandrakant Patil Accident: या अपघातामध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह ताफ्यातील पोलिसांच्या गाड्यांमधील 3 पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. हा अपघात नेमका कशामुळे झाला याबाबतची माहिती खुद्द आमदार पाटील यांनी दिली आहे.
Chandrakant Patil Accident
Chandrakant Patil AccidentSarkarnama

Chandrakant Patil Accident: शिवसेना (Shivsena) एकनाथ शिंदे गटाचे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Patil) यांच्या गाडीला आज (1 एप्रिल) रोजी दुपारी अपघात झाला आहे. या अपघातामध्ये आमदार पाटील यांना किरकोळ दुखापत झाली असून, त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात सोमवारी दुपारी मुक्ताईनगर (Muktainagar) तालुक्यातील जुना कुंड रस्त्यावर घडला. धक्कादायक बाब म्हणजे, चंद्रकांत पाटील यांच्याच ताफ्यातील पोलिसांच्या गाड्या एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे.

या अपघातामध्ये आमदार चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Patil) यांच्यासह ताफ्यातील पोलिसांच्या (Police) गाड्यांमधील 3 पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत, तर आमदार पाटील यांनाही किरकोळ दुखापत झाली आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबतची माहिती खुद्द आमदार पाटील यांनी दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले, मुक्ताई नगरवरून जुना कुंड रस्त्याने जात असताना काही शेतकरी (Farmer) आमच्यासाठी रस्त्यावर थांबले होते. शेतकऱ्यांना पाहून चालकाला गाडी थांबवायला सांगितली. या वेळी आमची गाडी रस्त्यावर थांबली असतानाच आमच्याच ताफ्यातील सुरक्षारक्षकांच्या गाडीचा ब्रेक न लागल्याने ती आमच्या कारवर जोरात आदळली. यामध्ये माझ्यासह 3 पोलिस कर्चमाऱ्यांना दुखापत झाली असून, त्यांच्यावर सध्या मुक्ताईनगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

Chandrakant Patil Accident
Dharashiv Loksabha News : महायुतीकडून धाराशिवसाठी चर्चेत आलेले 'हे' नाव तरी खरे ठरणार का?

या अपघातात (Accident) चंद्रकांत पाटलांच्या ताफ्यातील एक पोलिस गाडी भरधाव वेगाने दुसऱ्या गाडीवर आदळल्याने हा अपघात झाला. या अपघातात पोलिसांच्या गाडीच्या बोनेटचं नुकसान झालं आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आमदार चंद्रकांत पाटील यांना किरकोळ दुखापत झाली असली तरी त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती समोर आली आहे.

(Edited By Jagdish Patil)

R

Chandrakant Patil Accident
Ajit Pawar News : फडणवीसांसमोरच अजितदादांचा पारा चढला; म्हणाले, 'चंद्र-सूर्य आहेत, तोपर्यंत कुणी मायचा लाल...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com