
Ahilyanagar News : शेतकऱ्यांना वेळेवर वीज मिळत नसल्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार अमोल खताळ चांगलेच संतापले आहेत.
'कामात सुधारणा करा. वेळेला महत्त्व द्या. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी इथं आहात. शेतकऱ्यांच्या प्रश्नात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही. तसे झाल्यास बदल्यांसाठी तयार राहा', असा सज्जड इशारा आमदार खताळ यांनी दिला आहे.
संगमनेर तालुक्यातील साकूर इथल्या शेतकऱ्यांनी (Farmer) वेळेवर वीज मिळत नाही. पाणी आले आहे, तर वीज नाही. महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना विचारणा करायला गेल्यास, त्यांच्याकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत नाही, अशा तक्रारी आमदार खताळ यांच्याकडे केल्या. यावर आमदार खताळ महावितरणच्या अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले.
आमदार खताळ यांनी महावितरणमधील (Mahavitaran) ठेकेदारीची मक्तेदारी मोडून काढण्याचा इशारा दिला. अधिकाऱ्यांना आमचा कोणी कार्यकर्ता त्रास देत असेल, तर आम्ही अधिकाऱ्यांसोबत आहोत. परंतु ग्राहकांना, शेतकऱ्यांना महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्रास दिल्यास, मी शेतकऱ्यांबरोबर आहे, असे सांगितले.
महावितरणच्या अधिकारी, कर्मचारी यांनी वेळेत कामात सुधारणा करावी. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर अजिबात हलगर्जीपणा खपून घेणार नाही. काम जमत नसेल, तर बदल्या करून घ्या. कामात सुधारणा करायची नसेल, तर बदल्यांसाठी तयार राहा, असा इशारा आमदार खताळ यांनी दिला.
महावितरणचे कार्यकारी अभियंता अनिल थोरात यांनी यावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांशी व्यवस्थित वागावे. ग्राहकांना सन्मानाची वागणूक द्यावी. यावरून तक्रारी मिळाल्यास, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.