Sanjay Raut News: खासदार राऊत यांना दिलासा, अंतरिम जामीन मंजूर!

Sanjay Raut Got Relief from District Court: वादग्रस्त वक्तव्याबाबत नाशिकच्या पोलिसांनी खासदार राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Bail for Sanjay Raut : नाशिक दौऱ्यावर असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने खा. राऊत यांना ५० हजारांच्या जातमुचलक्यावर २३ तारखेपर्यंत अंतरिम जामीन मंजूर करीत दिलासा दिला. (Nashik Court grant a bail to MP Sanjay Raut)

राज्यातील सरकार (Maharashtra Government) असंवैधानिक मार्गाने सत्तेवर आले आहे. या बेकायदेशीर सरकारचे बेकायदेशीर आदेशांचे पालन पोलिसांनी (Police) करू नये. अन्यथा त्यांच्याविरोधात देखील गुन्हा दाखल होऊ शकतो, असे विधान खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले होते.

Sanjay Raut
Criticism On Sanjay Raut: संजय राऊत हे मुस्लिम लीगचे प्रवक्ते; कुणी केली टीका?

मुंबई नाका पोलिस ठाण्यातील हवालदार ललित केदारे (रा. बनकर मळा, पुणा रोड, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या शुक्रवारी (ता. १२) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर असताना, शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली होती.

या पत्रकार परिषदेमध्ये खासदार राऊत यांनी, शिंदे -फडणवीस सरकारवर टीका करताना, हे सरकार तीन महिन्यांत जाणार. हे सरकार घटनाबाह्य आहे. या सरकारने जे आदेश काढले ते सर्व बेकायदेशीर आहे. प्रशासन आणि पोलिसांना माझे आवाहन आहे, की बेकायदा सरकारचे बेकायदा आदेश पाळू नका. ते तीन महिन्यांत जाईल. बेकायदा आदेश पाळाल तर तुम्ही अडचणीत याल. न्यायालयाचा लढा आता अंतिम टप्प्यात आला आहे, असे म्हणाले होते.

Sanjay Raut
Dr. Bharti Pawar News: राज्यमंत्री पवार यांनी `जिप`च्या कामकाजाचे वाभाडे काढले

खासदार राऊत यांच्या या वक्तव्यामुळे पोलिसांविषयी समाजात अप्रीतीची भावना निर्माण होईल. तसेच, सार्वजनिक शांतता बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे याप्रकरणी खासदार राऊत यांच्याविरोधात मुंबई नाका पोलिसांत पोलिस अप्रीतीची भावना चेतवणे अधिनियम १९२२ चे कलम ३(१) सह भादंवि ५०५ (१) (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी, खा. राऊत यांनी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर मंगळवारी (ता. १६) न्या. राठी यांच्यासमोर सुनावणी झाली. या वेळी खा. राऊत यांच्यावतीने ॲड. एम. वाय. काळे यांनी युक्तिवाद केला. त्यानुसार, न्यायालयाने खा. राऊत यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे खा. राऊत यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com