Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरेंची तोफ लवकरच श्रीगोंद्यात धडाडणार

Sajan Pachpute Joins Thackeray Group : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे लवकरच श्रीगोंद्यात सभा घेणार आहेत.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Sajan Pachpute Joins Shivsena UBT : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे लवकरच श्रीगोंद्यात सभा घेणार आहेत. नगर जिल्ह्यात ठाकरे गटाची ताकद पुन्हा वाढत आहे. नुकतेच शिर्डी लोकसभेचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्याचबरोबर श्रीरामपूरचे माजी नगरसेवक संजय छल्लारे, सुधीर वायखिडे यांनीही 'मातोश्री' येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधत पक्षप्रवेश केल्यामुळे नगरमध्ये ठाकरे गटात मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होत आहे. उद्धव ठाकरे नवीन कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी सभा घेणार आहेत.

भाजपचे (BJP) आमदार बबनराव पाचपुते यांचे पुतणे, काष्टी गावचे सरपंच साजन पाचपुते यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत ठाकरे गटात सोमवारी प्रवेश केला. तालुक्यातील सुमारे एक हजार कार्यकर्ते त्यांच्यासोबत मुंबईत पोहचले होते. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर उपनेतेपदाची जबाबदारीही सोपवली आहे. (Maharashtra Political Crisis)

Uddhav Thackeray
Pankaja Munde On Parli Defeat : तिसरा उमेदवार असता तर परळीत माझा पराभव अशक्य होता; पंकजांच्या मनात पराभवाची सल कायम

साजन पाचपुते यांच्या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यात आपली सत्ता पुन्हा आण्यासाठी साजन पक्षात आले आहेत, मला आनंद आहे. ते सहकुटुंब शिवसेनेत आले आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे अनेकांच्या पोटात गोळा आला आहे, तो आलाच पाहिजे. राजकारणात अशी पद्धत आहे, की सगळे सत्तेच्या बाजूने जातात. मात्र, साजन हे सत्ता आण्यासाठी आपल्याकडे आले आहेत. (Political Web Stories)

Uddhav Thackeray
Thackeray Vs Fadnavis : फडणवीसांचं ज्ञान काढत उध्दव ठाकरेंचा जशास तसा पलटवार; म्हणाले, '' वटहुकुम हा राज्य नाही तर...''

आपल्याला आता संपूर्ण राज्यात फिरायचे आहे. त्यामुळे तुम्हाला शिवसेनेचे (Shivsena) उपनेतेपद दिली, असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. आपल्याला आता संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढायचा आहे. आपले ठरले होते, प्रवेश झाला की, श्रीगोंद्यामध्ये सभा घ्यायची आहे, मी सभेला येणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे ठाकरे यांची सभा नगर जिल्ह्यात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Political Short Videos)

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com