सत्ता आज नाही, उद्या येईल मात्र पक्षासाठी काम करा!

नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.
Nitin Gadkari
Nitin GadkariSarkarnama
Published on
Updated on

जळगाव : सत्ता येते आणि जाते, (Power) आज महाराष्ट्रात (Maharashtra) आपली सत्ता नाही, उद्या येईलही मात्र प्रत्येकाने संघटनेसाठी (BJP) काम करून ती बळकट केली पाहिजे, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केले, भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

Nitin Gadkari
सूर्य- चंद्र, तारे राहतील तोवर नितीन गडकरींचे नाव लक्षात राहील!

जळगावातील औद्यागिक वसाहतीतील हॉटेल प्रेसिडेंट कॉटेज येथे भारतीय जनता पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

यावेळी माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, आमदार मंगेश चव्हाण, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आदी उपस्थित होते. प्रारंभी जिल्हा व महानगर भारतीय जनता पक्षातर्फे मंत्री गडकरी यांचे स्वागत करण्यात आले.

Nitin Gadkari
संजय राऊतांनी आम्हाला रामभक्ती शिकवू नये!

यावेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, की सत्ता महत्त्वाची नाही, जनतेसाठी काय करतो? हे महत्त्वाचे आहे. सत्ता येते आणि जाते, आज आपली राज्यात सत्ता नाही, परंतु उद्या येईलही परंतु संघटना आणि जनतेसाठी कार्य महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने जनतेसाठी कार्य केले पाहिजे, ‘अत्योंदय’ म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेल असे काम केले पाहिजे. विरोधात असतानाही आपण जनतेसाठी काम करू शकतो, ते आपण केले पाहिजे. तसेच संघटना बळकटीकडेही लक्ष दिले पाहिजे.

ते पुढे म्हणाले, जळगावात (स्व.) चंद्रकांत मेंडकी, (स्व.) डॉ. अविनाश आचार्य, (स्व.) हरिभाऊ जावळे यांनी केलेल्या कार्याची त्यांनी आठवण करीत म्हणाले, संघटनेच्या बळकटीसाठी कार्य करून त्यांनी त्यांच्या समाजसेवेच्या कार्यातून बळ दिले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी संघटनेसाठी केलेल्या कार्याची आठवण त्यांनी करून दिली. ज्यावेळी भाजपचे दोन खासदार होते, त्यावेळी इतर सर्वजण पक्षाला हिणवत होते, त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी यांनी सांगितले, की आज आमचे दोन खासदार आहेत, मात्र भविष्यात आमचे संसदेत बहुमतापेक्षा अधिक खासदार असतील व देशात आमची सत्ता असेल आणि संघटना बळकट करून त्यांनी हे खरे करून दाखविले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सत्तेचा विचार न करता संघटना बळकटीकडे लक्ष द्यावे. जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गडकरीकडून ‘सकाळ’ च्या बातमीचा उल्लेख

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या जिल्हादौऱ्या निमित्ताने ‘सकाळ’ ने रस्ते विकासाचे वृत्त प्रसिद्ध केले होते. हॉटेल प्रेसिडेंट कॉटेज येथे गडकरी यांनी ‘सकाळ’ चे वाचन केले. शिवतीर्थ मैदानावर झालेल्या रस्ते लोकार्पणाच्या सभेत त्यांनी ‘सकाळ’ च्या बातमीचा उल्लेखही केला.

---------

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com