
Ahilyanagar News : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने संगमनेरमध्ये इतिहास घडवला. 40 वर्षांची सत्ता असलेल्या काँग्रेसला संगमनेरमध्ये धक्का दिला. अमोल खताळ या तरुणाने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांचा विधानसभा निवडणुकीत पराभव केला. यामुळे आमदार झालेले अमोल खताळ यांचा 'कॉन्फिडन्स' वाढला आहे.
आता आमदार खताळ अॅक्शन मोडवर आले असून, त्यांनी संगमनेर मतदारसंघातील विविध कार्यालयांना भेटी देण्यास सुरवात केली आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांना तंबी देताना, आता 'यशोधन'च्या कामाची सवय सोडा, असे म्हणत बाळासाहेब थोरात यांना देखील डिवचले.
आमदार खताळ यांनी संगमनेरच्या पंचायत समितीच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी अधिकाऱ्यांशी विविध विकासकामांच्या संदर्भात चर्चा केली. पंचायत समितीमधून चालणाऱ्या विविध कामांची, योजनांची माहिती घेताना खताळ यांनी प्रलंबित कामांची यादी तयार करण्याच्या सूचना दिल्या.
सर्वसामान्यांची सत्ता असून, फक्त कामे सुचवा. पण त्यात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेणार नाही, असे खताळ यांनी सांगितले. भाजपचे (BJP) आमदार राधाकृष्ण विखे यांचे जनसंपर्क अधिकारी प्रमोद रहाणे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामभाऊ रहाणे उपस्थित होते.
शिवसेनेचे (Shivsena) आमदार खताळ म्हणाले, "मी कोणत्याही क्षणी कुठल्याही विभागात येऊ शकतो. पंचायत समिती, अंगणवाडीत, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय केंद्राची तपासणी करू शकतो. अधिकारी व कर्मचारी जागेवर सापडले नाही, तर त्यांची गय होणार नाही. पंचायत समितीच्या सर्व विभागप्रमुखांना दिली".
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तंबी देताना खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांना देखील डिवचले. "अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कामाची सवय बदलावी. यशोधन कार्यालयातून आलेल्या लोकांची काम करण्याची सवय होती. आता ती सवय बदलावी लागणार आहे. यापुढील काळात यशोधन वगैरे काही चालणार नाही. आमदार कार्यालयाकडून आलेल्या सूचनांनुसार सर्वसामान्य जनतेची कामे करण्यावर भर द्या. मतदारसंघातील सर्वसामान्य लोकांचे कुठलेच काम अडले जाणार नाही, याची दक्षता घ्यावी", असेही आमदार खताळ यांनी सुनावले.
अमोल खताळ यांनी विचारलेल्या सलग प्रश्नांना अधिकाऱ्यांना देखील सकारात्मक प्रतिसाद दिला. पंचायत समितीमधील गटविकास अधिकारी यांनी सर्व विभागांचा आढावा दिला. पंचायत समितीत व तालुक्यातील कुठल्याही सरकारी कार्यालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सर्वसामान्यांची प्राधान्यांनी कामे करावीत.
कोणाचेही काम कोणत्याही कारणांनी अडवून ठेवू नये. सरकारी कार्यालयात मी कधीपण येईल. कामात शिस्त आणि वेग वाढवा. कामात काही अडचणी आल्यास मला कळवा. विविध विकास कामांना लागणार निधी आणून देतो. पण कामात हलगर्जीपणा नको, अशा सूचना आमदार खताळ यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.