Uday Samant: मुख्यमंत्र्यांकडे बॅग असल्या म्हणजे त्यात पैसेच असतात का? सामंतांनी घेतला राऊतांचा समाचार

Shiv Sene Shinde Group Politics Uday Samant On Sanjay Raut : मंत्री सामंत यांनी संजय राऊत यांच्या आरोपांची दखल घेण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यांना आपला पराभव दिसू लागल्याने, ते काहीही बोलत आहेत असे सांगितले.
Uday Samant
Uday SamantSarkarnama

Uday Samant News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी नाशिक दौऱ्यावर होते. याबाबत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. राऊत यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचा उदय सामंत (Uday Samant News) यांनी चांगलाच समाचार घेतला.

मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत आलेल्या अधिकाऱ्यांकडे मोठ्या मोठ्या बॅग होत्या. त्याची चौकशी करण्याची मागणी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. त्याबाबत मंत्री सामंत यांनी संजय राऊत यांच्या आरोपांची दखल घेण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यांना आपला पराभव दिसू लागल्याने, ते काहीही बोलत आहेत असे सांगितले.

मंत्री सामंत म्हणाले, माझ्या गाडीमध्ये देखील आता बॅग आहेत. त्यामध्ये माझे कपडे आहेत. कुणाला आवश्यकता असेल, किंवा टीका करणाऱ्यांना पाहिजे असेल तर, त्यांनी पाहायला माझी हरकत नाही. मात्र आपले उमेदवार निवडून येत नाहीत याची जाणीव झाली की, अशा प्रकारचे फालतू आरोप होतात. त्याला कोणीही किंमत देत नाही, असे त्यांनी ठणकावले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uday Samant
Lok Sabha Election 2024 : रायबरेलीतून उमेदवारी का? राहुल गांधींनी प्रचार सभेतच सांगितलं कारण...

नाशिक मतदारसंघात (Nashik Constituency) महायुतीच्या उमेदवाराचा प्रभाव वाढत आहे. मतदारांकडून प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांच्या दौऱ्यात सुमारे एक हजाराहून अधिक उद्योजक व विविध संघटनांचे प्रतिनिधी एकत्र आले होते. शंभर ते दीडशे संस्था त्यात होत्या. कदाचित एवढा मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर राऊत यांचा पोटशूळ उठला असावा. नाशिकची जागा आपण गमावतो आहे. याची जाणीव झाल्याने त्यांनी आरोप प्रत्यारोप सुरू केले आहेत.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कांदा निर्यात बंदीचा प्रश्न डोकेदुखी झाला आहे. या संदर्भात शेतकरी नाराज आहे. त्यावर मंत्री सामंत यांनी सध्या आचारसंहिता आहे. त्यामुळे स्पष्ट काही बोलता येत नाही. मात्र केंद्र शासनाकडून निर्यातीबाबत शेतकऱ्यांना ज्या काही अडचणी असतील, त्या सोडविण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेणार आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कोणतेही नुकसान होणार नाही. यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल मुख्यमंत्र्यांनी देखील हीच भूमिका मांडली आहे. विरोधक मात्र शेतकऱ्यांची नाहक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे टीका त्यांनी केली.

Uday Samant
Pune Lok Sabha Election 2024 Voting LIVE: पहिल्यांदाच मतदानासाठी आली अन् तिची तळपायाची आग मस्तकात गेली!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com