Ambadas Danve: शिवसेना गद्दारांचा करेक्ट कार्यक्रम करेल!

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा नाशिक येथे उपनेते सुनील बागूल यांनी सत्कार केला.
Ambadas Danve with shivsena leaders
Ambadas Danve with shivsena leadersSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : ज्यांनी शिवसेनेची (Shuvsena) गद्दारी केली त्यांचे काय हाल होत आहेत, हे सर्वांनी बघितले आहे. आताही जे शिवसेना सोडून बाहेर पडले त्या गद्दारांचा (Traiters) करेक्ट कार्यक्रम (Taught a lesson) मतदार करतील, असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते (Leader of opposition) अंबादास दानवे (Amabadas Danve) यांनी केला. (Ambadas Danve claim, after ministry`s expansion Rebel mlas will disturb)

Ambadas Danve with shivsena leaders
काँग्रेसच्या 'त्या' सात आमदारांना सोडू नका : पृथ्वीराज चव्हाण आक्रमक

त्र्यंबकेश्वर येथे देवदर्शनानिमित्त ते नाशिकमध्ये आले होते. या वेळी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल शिवसेना कार्यालयात त्यांचा शिवसेना नाशिक महानगरातर्फे सत्कार करण्यात आला.

Ambadas Danve with shivsena leaders
‘खोके हराम’ संघटना: शिवसेनेने बंडखोरांच्या जखमेवर मीठ चोळलं...

या वेळी शिवसेना उपनेते सुनील बागूल, सहसंपर्कप्रमुख दत्त गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, मनपा माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, माजी महानगरप्रमुख देवानंद बिरारी, भाविसे जिल्हा संघटक वैभव ठाकरे, नाशिक पूर्व विधानसभाप्रमुख योगेश बेलदार, पश्चिम नाशिक विधानसभाप्रमुख सुभाष गायधनी, महिला आघाडी जिल्हा संघटक शोभा मगर, मंगला भास्कर, शोभा गटकळ, समन्वयक श्‍यामला दीक्षित, मंदा दातीर, मधुकर जाधव आदी उपस्थित होते.

श्री. दानवे सत्काराला उत्तर देताना म्हणाले, मी अजून माझ्या नवीन खुर्चीवर बसलो नाही. असे उद्धवजी यांना सांगितले असता त्यांनी या खुर्चीवर बसायचेच नाही असे सांगताच मी अवाक झालो. खुर्चीत बसण्यापेक्षा सतत कार्यमग्न राहा, असेच त्यांना सुचवायचे होते आणि दुसरे म्हणजे विरोधी बाकावर आपण जास्त दिवस बसणार नाही असा दांडगा आत्मविश्वासही त्यांच्या या बोलण्यातून झळकत असल्याचे मला जाणवले. या वेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. भाजप हा विश्वासार्ह पक्ष नाही. यापुढे मंत्रिमंडळाचा विस्तार होईल तेव्हा शिवसेनेतून बाहेर पडलेल्या गद्दारांमधील खरी धुसफूस बाहेर पडेल, असे उपनेते सुनील बागूल यांनी सांगितले.

नाशिक जिल्ह्यात शिवसेना मजबूत असून भविष्यातही अनेक लोक या पक्षाशी जोडले जातील, असा विश्वास दत्ता गायकवाड यांनी व्यक्त केला. गद्दार लोक बाहेर पडल्याने शिवसेना अधिक मजबूत होणार असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्ह्यात सर्वत्र शिवसेनेचाच भगवा फडकेल, असा विश्वास जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी व्यक्त केला. विधान परिषद विरोधी पक्षनेते पदाला श्री. दानवे न्याय देतील, असे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सांगितले.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com